आपल्या आंदोलनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे आणि केंद्र सरकारलाही सळो की पळो करुन सोडणारे अण्णा हजारे आता अडचणीत सापडले आहे. आता त्यांच्याविरोधातच आंदोलन पुकारले जाणार आहे. १ जूनपासून हे आंदोलन सुरु होणार आहे. (somnath kashid moment against anna hazare)
महागाई आणि भ्रष्टाचारामध्ये सर्वसामान्य होरपळत आहे. असे असताना अण्णा जागे का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता जूनमध्ये ढोल बजाव, अण्णा हजारे जगाओ आंदोलन पुकारण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद यांनी याबाबत घोषणा केली आहे.
गेली अनेक वर्षे महागाई, भ्रष्टाचार आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाची राळ उठवणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. गेल्या दोन निवडणूकीन केंद्रात आलेल्या भाजपने आपली आश्वासने पाळली नाहीत.
देशात सतत गॅस दरवाढ, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होत चालली आहे. यामुळे सर्व सामान्यांचे जगणे मुश्लिल झाले आहे. महागाई विरोधात जनता आक्रोश करत आहे. असे असताना अण्णा हजारे शांत आणि निवांत कसे आहेत? असा प्रश्न सोमनाथ काशिद यांनी उपस्थित केला आहे.
अण्णा हजारे झोपले असतील, तर त्यांना जनतेसाठी उठण्याची गरज आहे. त्यामुळे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील निवासस्थानाबाहेर १ जून रोजी ढोल बजाव, अण्णा हजारे जगाओ, असे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाबाबत सोमनाथ काशिद यांनी माहिती दिली आहे. सध्या हे आंदोलन चांगलेच चर्चेत आले आहे. आपल्या आंदोलनामुळे चर्चेत येणारे आणि सरकारला आंदोलन करुन सळो की पळो करुन सोडणारे अण्णा आता त्यांच्याविरोधात होणाऱ्या आंदोलनाला कसे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकला फाशी होणार कळताच पाकिस्तान संतापला, म्हणाला…
प्राजक्ताच्या बोल्ड भूमिकेवर तिच्या आईने थेट दिले होते ‘हे’ उत्तर; म्हणाली होती की, आलिया भटने…
आम्ही ३ मंदिरे मागितली होती, तुम्ही दिली नाही, आता.., ज्ञानवापीवर भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य