Share

Nagaraj Manjule: याला म्हणतात खरी मैत्री! बालपणीच्या मित्रासाठी नागराज मंजुळेंनी केलं असं काही की..वाचून कराल कौतूक

Nagraj Manjule

Nagaraj Manjule: दिग्दर्शक नागराज मंजुळे अत्यंत कमी वेळात घराघरांत पोहोचले आहेत. नागराज मंजुळे यांचे चित्रपट व त्यांचे भन्नाट दिग्दर्शन यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे. विविध कार्यक्रमांमुळे व नवनवीन चित्रपटांमुळे नागराज मंजुळे ( Nagraj Manjule) कायम चर्चेत आहेत. एक मित्र म्हणून नागराज मंजुळे किती चांगले आहेत. हे दाखवणारी एक घटना नुकतीच घडली आहे.

नागराज मंजुळे यांनी नुकतीच त्यांच्या मित्राच्या परीक्षेसाठी सोलापूर विद्यापीठात हजेरी लावली. यामुळे त्यांच्या ‘मित्रप्रेमाची’ ( Friendship ) चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. सोमवारी( दि.21) नागराज मंजुळे त्यांचे मित्र प्रा. संजय साठे यांच्या परीक्षेसाठी ते विद्यापीठात उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात प्रा. संजय साठे यांची पीएचडीची खुली मौखिक परीक्षा होती. यावेळी नागराज मंजुळे त्यांच्या अतिशय व्यस्त शेड्युल मधून वेळात वेळ काढून संजय साठे यांच्या सोबत उपस्थित होते. दरम्यान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रा. संजय साठे हे नागराज मंजुळे यांचे जुने मित्र असून ते दोघे एकाच गावातले आहेत. त्यांनी नागराज मंजुळे यांच्या सैराट (Sairat movie) या चित्रपटात शिक्षकाची भूमिका देखील साकारली होती. त्यांनी प्राचार्य महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पीएचडी पूर्ण केली आहे.

विद्यापीठात उपस्थित राहिल्यानंतर नागराज मंजुळे यांनी स्वतः कुलगुरू दालनात जाऊन कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गप्पा देखील मारल्या. दरम्यान कुलसचिव योगिनी यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-
Dhananjay Powar: युट्यूब स्टार धनंजय पोवार एवढे फेमस कसे झाले? वाचा तुम्हाला खळखळून हसवणाऱ्या डिपी दादाबद्दल…
Tamilnadu : तामिळनाडूच्या संघाने केला वनडेमध्ये विश्वविक्रम, तब्बल ५०० धावा ठोकत इंग्लंडला टाकले मागे 
Big Boss Marathi : किरण माने घराबाहेर पडताच विकास सावंतची पलटी? अपुर्वा नेमळेकरशी सलगी करत तोंडात भरवला घास

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now