Share

‘या’ कारणामुळे भाजपने पंकजा मुंडेना पुन्हा डावलले; निवडणुकीच्या दिवशीच समोर आले गुपित

pankaja munde

आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली नाही, म्हणून समर्थकांमध्ये नाराजी दिसत आहे. पुन्हा एकदा भाजपने विधानपरिषदेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डावलले आलं.

यावर आता  मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते याबाबत काल माध्यमांशी बोलत होते. ‘पंकजांची लोकप्रियता आणि नेतृत्व क्षमतेमुळे भाजप नेते धास्तावले असल्याच शेळके यांनी स्पष्टच सांगितलं आहे.

पुढे बोलताना शेळके म्हणाले, ‘विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कर्जतमधून पराभूत झालेले राम शिंदे यांना विधान परिषेदवर संधी दिली. मग, हा न्याय पंकजांना लागू होत नाही का?,’ असा संतप्त सवाल शेळके यांनी उपस्थित केला आहे. मुंडे कुटुंबाला संघर्ष हा काही नवीन नाही, असं शेळके यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, ‘पंकजांना विधान परिषदेची संधी मिळाल्यास त्या पुन्हा सक्रिय होतील. तो आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका ठरु शकतो. ही भीती वाटत असल्यामुळेच भाजपचे काही नेते त्यांना वारंवार डावलत असल्याच शेळके यांनी म्हंटले आहे. यासाठी भाजपचे काही नेते नवे डाव आखत आहेत, असं शेळके यांनी म्हंटले आहे.

पुढे बोलताना आमदार शेळके यांनी भाजपला इशारा दिला आहे. याबद्दल बोलताना शेळके म्हणाले, ‘मुंडे समर्थकांना संधी दिल्याचे भासवून पंकजांना मात्र पदापासून दूर ठेवायचे, असल्या राजकीय खेळ्या आता जास्त दिवस टिकणार नसल्याच शेळके यांनी भाजपला लक्ष करताना म्हंटले आहे.

तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, म्हणून कार्यकर्ते नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या नाराजीतून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या कट्टर समर्थकाचे नाव मुकुंद गर्जे असून, ते पाथर्डी येथील आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now