‘INS विक्रांत’ प्रकरणात भाजपचे नेते किरीट्ट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई न्यायालयाने फेटाळूल लावला आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मोठी माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना, आता किरीट सोमय्यांना कधीही अटक होऊ शकते असे वकील घरत यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, किरीट सोमय्या यांनी कोर्टात चोरी मान्य केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
यावेळी वकील घरत यांनी म्हटले आहे की, “किरीट सोमय्या यांच्या प्रकरणात सकाळी युक्तीवाद झाला. सोमय्या यांनी त्यांच्या जामीन अर्जासोबत जी कागदपत्रे सादर केली होती तीच आम्ही विशेष करून दाखवली. कारण त्यांनी त्या कागदपत्रांमधून तो गुन्हा जवळजवळ कबुलच केला होता. तसेच फोटोग्राफ देखील लावले होते. त्यामुळे आमचा युक्तीवाद तोच झाला. मला नुकतंच सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचं समजलं. निकाल हातात आल्यावर त्यावर अधिक बोलेल.”
तसेच, “एका पैशाची केली तरी ती चोरीच आणि कोट्यावधी रुपयांची केली तरी ती चोरीच. त्यामुळे चोरी ही चोरीच असते. ही चोरी किरीट सोमय्या यांनी मान्य केली. आता त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल,” असे घरत यांनी म्हणले आहे. यानंतर किरीट सोमय्या यांच्या वकील पावनी चड्डा यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
याचबरोबर, “न्यायाधीशांचं म्हणणं असं आहे की गोळा केलेले ११ हजार रुपये संबंधितांकडे जमा झालेले नाहीत. ते पैसे दिल्याचे सबळ पुरावे नाहीत. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात यावर स्पष्टीकरण देऊ. आम्ही काही दिलासा देण्याची विनंती केली होती मात्र, न्यायालयाने ती मागणी फेटाळली आहे. आज किरीट सोमय्या यांच्या प्रकरणी निकाल देण्यात आला, उद्या नील सोमय्या यांच्या प्रकरणी निकाल येईल,” असे वकील पावनी चड्डा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युद्धनौका ‘INS विक्रांत’ प्रकरणात भाजपचे नेते किरीट्ट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. त्याचबरोबर या प्रकरणात त्यांचा मुलगा नील सोमय्याही सहभागी असल्याचे राऊतांनी म्हटले होते. त्यामुळे मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारच्या मध्यरात्री माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावर पिती पुत्राला लवकरच अटक होणार असल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे राजकिय वर्तुळात INS विक्रांत प्रकरण उघडकीस आल्यामुळे खळबळ माजली आहे.
महत्वाच्या बातम्या
कोट्यवधींची मालकीन असणाऱ्या समंथाकडे एकेकाळी शिक्षणासाठी नव्हते पैसे; ‘हे’ काम करून झाली टॉलिवूडची स्टार
रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली? भट्ट कुटुंबीयांनी वाढवलं कन्फ्यूजन
राज ठाकरेंनी मराठी मुद्द्यावरून यु-टर्न घेतलाय का? ठाण्यातील ‘त्या’ बँनरची चर्चा
मी असे पुरस्कार घेत नाही पण, ‘हा’ माझा पहिला अन् शेवटचा पुरस्कार; मोदींनी मंगेशकर कुटुंबीयांना स्पष्टच सांगितलं