भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या हल्ला प्रकरणी आता एक नवीन माहिती हाती आली आहे. सोमय्यांच्या जखमेबद्दल पोलिसांना संशय व्यक्त केला आहे. पोलिस आता या प्रकरणी अॅक्शन मोडमध्ये आले असून कसून तपास करत आहे.
तपासादरम्यान नेमकं काय उघड होतय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात जात असताना, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या हनुवटीला किरकोळ दुखापत झाली.
या घटनेचा व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता. हल्ल्यानंतर समोर आलेल्या दृश्यांमध्ये किरीट सोमय्या यांना हनुवाटीतून रक्त येत असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, ही जखम बनावट असल्याची शंका पोलिसांकडून उपस्थित करण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे.
त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळ वळण लागणार असल्याचं बोललं जातं आहे. याचबरोबर किरीट सोमय्या हल्लाप्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी गृहखात्याकडून परिसरातील सीसीटीव्हीही तपासले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या या घटणेवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुन्हा भाजप – सेना आमनेसामने आली आहे.
तर दुसरीकडे किरीट सोमय्या मुंबई भाजपच्या शिष्टमंडळासह दिल्लीत दाखल झाले आहेत. ठाकरे सरकारची तक्रार करायला आपण दिल्लीत आल्याचं सोमय्या म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये भाजपा आमदार मिहीर कोटेचा, अमित साटम, पराग शाह, राहुल नार्वेकर आणि विनोद मिश्रा यांचा समावेश आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलिस ठाण्यात दाखल होताच शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी करत त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या. सोमय्या गाडीत मधल्या सीटवर बसले होते. या वेळी त्यांच्या गाडीच्या काचेवर दगड फेकण्यात आला. काच फुटल्यामुळे सोमय्या जखमी झाल्याचे समजते.
महत्त्वाच्या बातम्या
अमोल मिटकरी हा तमाशाच्या फडावरचा नाच्या तर शरद पवार…., सदाभाऊ खोतांचा जोरदार तडाखा
फिट ऍन्ड हॅन्डसम असूनही ‘हे’ अभिनेते नाही बनू शकले हिरो, पण खलनायक बनून कमावले नाव
अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या, सदाभाऊ खोत यांची जहरी टीका
शेतकऱ्यांनो माझे शब्द लिहून ठेवा,ऊसामुळे एकदिवस आत्महत्येची वेळ येईल : नितीन गडकरी