Share

उद्धव ठाकरेंचा सोमय्यांकडून माफिया म्हणून उल्लेख; शिंदे गटाने आक्रमक होतं उचललं मोठं पाऊल

राज्यात आता सत्तापालट झाला आहे. एकेकाळी सत्तेच्या बाकावर असलेले आता विरोधी बाकावर गेले आहेत. यामुळे राजकारणात केव्हा, काय होईल हे सांगता येत नाही हे अगदी खरं..! भाजप सोबतची युती तोडून उद्धव ठाकरे राष्ट्रवादी, कॉंग्रेस सोबत सत्तेत आले.

भाजपला डावलून या तिन्हीही पक्षाने मिळून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र अवघ्या अडीच वर्षात त्यांना सत्तेतून बाहेर पडाव लागलं. यासाठी निमित्त ठरलं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड..! शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले, आणि शिंदे यांनी भाजपसोबत युती करून नवीन सरकार स्थापन केलं.

यामुळे आता शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढला आहे. आता एकमेकांचे विरोधक देखील बदलले आहेत. शिवसेनेतील एक गट भाजपसोबत सत्तेत असल्यामुळे आता भाजप नेत्यांची गोची झाली आहे. सातत्याने शिवसेनेवर टीकेचे बाण सोडणारे भाजप नेते किरीट सोमय्या हे आता या पेचात सापडले आहे.

नुकतच त्यांनी केलेलं एक व्यक्तव्य वादात सापडलं आहे. सोमय्या यांनी शिवसेनेबद्दल केलेल्या टीकेमुळे शिंदे गट प्रचंड नाराज झाला आहे. सोमय्या यांनी केलेल्या व्यक्तव्याबद्दल शिंदे गटाने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. यामुळे आता शिंदे – फडणवीस सरकारमधील देखील नाराजीनाट्य समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

काल (गुरुवारी) सोमय्या यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर सोमय्या यांनी एक ट्वीट केले. ते त्यांच ट्विट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. ‘माफिया मुख्यमंत्रीना हटवल्याबद्दल अभिनंदन,’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

सोमय्या यांनी शिंदे यांचं अभिनंदन करत म्हटलं आहे की, ”मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माफिया मुख्यमंत्रीना हटवल्याबद्दल अभिनंदन केले.” यावरून आता शिंदे गटात प्रचंड नाराजी पसरली आहे. सोमय्या यांनी माफिया असा शब्द वापरणे चुकीचे असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

 

याबद्दल बोलताना केसरकर यांनी म्हंटलं आहे की, सोमय्या यांनी केलेल्या व्यक्तव्याबाबत फडणवीसांना आक्षेप कळविला आहे. त्यांना सोमय्यांना आवर घालण्यास सांगितले आहे. आमच्यात जे काही ठरले आहे, त्यानुसार भाजपा नेत्यांनी वागावे, असे फडणवीसांना सांगितले असल्याचे केसरकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-
इम्रान हाश्मीने कॉफी विथ करणमध्ये व्यक्त केली इच्छा, म्हणाला, मला दिपीकासोबत…
मला दिपीकासोबत ‘तसे’ सीन्स करायचेत, इमरान हाश्मीच्या वक्तव्याने सगळेच हैराण
उद्धव ठाकरेंचे ‘ते’ वक्तव्य झोंबले! ३० वर्षे साथ देणाऱ्या नेत्याने शिवसेना सोडून मनसेत केला प्रवेश

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now