सोशल मीडियामुळे अनेक कलाकारांना आपली कला सादर करणे शक्य होत आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे, तर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे सुद्धा कमवत आहे. त्यातलेच एक आहे सोलापूरचे शिंदे कुटुंब. (solapur shinde family earn 2 lakh)
सोलापूरचे शिंदे कुटुंब हे व्हिडीओ बनवून आणि त्या युट्युबवर अपलोड करून पैसे कमवतात. एकेकाळी पत्राच्या घरात राहणारे शिंदे कुटुंब हे आता एका चांगल्या मोठ्या घरात राहतात, इतकेच नाही तर त्यांनी एक कारही विकत घेतली आहे. त्यांच्या युट्युब चॅनेलचं नाव गणेश शिंदे मोहोळ असे आहे. तेच त्यांच्या उदरनिर्वाहच साधन बनलं आहे.
गणेश शिंदे आणि त्यांची पत्नी योगिता शिंदे हे पूर्वी टिकटॉक व्हिडीओ बनवायचे, पण ते बंद झाल्यामुळे त्यांनी युट्युबवर व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. टिकटॉकवर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये होती. टिकटॉकवरचे त्यांचे व्हिडीओ हे मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायचे, पण भारतात टिकटॉक बंद झाले.
त्यानंतर त्यांनी युट्युबवर आपलं अकाउंट बनवलं. सुरुवातीला त्यांना त्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं, पण एकेदिवशी त्यांनी युट्युबवर त्यांच्या स्वतःचेच व्हिडीओ बघितले, तेव्हाच त्यांनी ठरवलं की आपण यावर अकाऊंट बनवू आणि आपले व्हिडीओ अपलोड करू.
त्यानंतर गणेश आणि योगिता यांनी विनोदी व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना त्यातून उत्पन्न येत नव्हतं, पण नंतर नंतर त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले. तेव्हा त्यांनी युट्युबच्या काही अटी आणि शर्तींची पूर्तता केली आणि त्यांना पैसे येणं चालू झाले.
योगिता आणि गणेशसोबत त्यांची मुलगी शिवानी सुद्धा आता त्यांच्या व्हिडीओमध्ये दिसून येते. गणेश यांच्या युट्युब चॅनेलचे ८ लाखांपेक्षा जास्त सब्सक्राइबर आहेत. त्यांना यातून दीड ते दोन लाख रुपये महिन्याला मिळतात. गणेश हे आधी प्लंबिंगचे काम करायचे पण आता ते पूर्णवेळ व्हिडीओ बनवून युट्युब चॅनेल चालवतात.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ घडाळ्यात कधीच वाजत नाही १२; कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
‘तो’ काळ आला आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी खालावली, अशोकमामा स्पष्टच बोलले
VIDEO: राखी सावंतची नौटंकी पाहून नेटकरी संतापले, फेक बेबी बंप घालून म्हणाली, मी मसिहाला..