Share

राज्यातील लाचखोरी होणार बंद, पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीत आता ऑडिओ सुद्धा रेकॉर्ड होणार

सध्या अधिकाऱ्यांच्या लाचखोरीबद्दल अनेक तक्रारी केल्या जातात. पण अनेकदा पुरावे नसल्यामुळे न्यायालय त्यांना निर्दोष असल्याचे सांगत सोडून देत असते. अशात सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे लाचखोरी थांबणार आहे. (solapur police station recording service)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यामध्ये आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबतच ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा सुरु केली जाणार आहे. सोलापूरमधील सात पोलिस ठाण्यांमध्ये अशाप्रकारची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी आणि फिर्यादी तसेच आरोपी यांच्यातील आता संवाद जाणून घेता येणार आहे.

तसेच ऑडिओ रेकॉर्ड होत असल्यामुळे अधिकाऱ्यांची आरोपींसोबत आणि फिर्याद्यांसोबत कशी वागणूक आहे, हेही लक्षात येईल. तसेच कोणत्या आरोपीने अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याने लाच घेण्याचा प्रयत्न केला, तेही त्यामध्ये रेकॉर्ड होणार आहे. त्यामुळे आता लाच घेण्याचे प्रमाणही कमी होणार आहे.

सामान्य लोक फिर्याद दाखल करण्यासाठी आले असता अनेकदा पोलिस ठाण्यात त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक केली जाते. अरेरावेची भाषा वापरली जाते. तसेच हवी तशी फिर्याद दाखल केली जात नाही, असे आरोप अनेकदा पोलिस अधिकाऱ्यांवर केले जातात.

तसेच काही वेळा काही फिर्यादी सुद्धा पोलिसांवर खोटे आरोप करत असतात. त्यामुळे त्यांची बदनामी होत असते. तसेच फिर्यादी आणि पोलिसांमध्ये वादवादी ही होत असते. त्यामुळे कोण बरोबर हे समजणे कठीण होऊन जाते. त्यामुळे आता पोलिस ठाण्यात ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधाही करण्यात येणार आहे.

कॅमेऱ्यासोबतच ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा असल्यामुळे तिथले संभाषण रेकॉर्ड होईल. तसेच या भितीमुळे लाच घेण्याचे आणि देण्याचे प्रकारही कमी होतील, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. या सुविधेमुळे आरोप-प्रत्यारोपणाची वस्तुस्थिती समजण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
शिंदेंच्या बंडाचा भाजपने साधला डाव! भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर; लवकरच फडणवीस “पुन्हा येणार”
लव्ह यू.. म्हणत अभिनेत्री सई ताम्हणकरने दिली प्रेमात पडल्याची कबुली; पहा कोण आहे तो नशीबवान
संजय राऊतांनी केलं चक्क नारायण राणेंचं कौतुक, म्हणाले, ‘त्या गोष्टीत मी राणेंना मानतो’

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now