प्रसिद्ध अभिनेता सोहेल खान आणि सीमा खान यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोहेल खान आणि सीमा खानचे हे वैवाहिक जीवन २४ वर्षांपासून सुरु होते. पण त्यांनी आता घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. (sohel father saleem khan two marriege)
दोघांनी घटस्फोटासाठी आज मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला असून, शुक्रवारी दोघेही न्यायालयाबाहेर दिसले. दोघांनीही याबाबत मीडियाला काहीही सांगितले नसले तरी मीडियाच्या सूत्रांनुसार दोघेही आता २४ वर्षांचे लग्न संपवणार आहेत. सोहेल आणि सीमा यांना योहान आणि निर्वाण ही दोन मुले आहेत.
२०१७ मध्येही या कुटुंबाला घटस्फोटाचा सामना करावा लागला. खरं तर, सोहेलचा मोठा भाऊ अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. हे नातेही लग्नाच्या तब्बल १९ वर्षांनी तुटले होते. त्यावेळीही लोकांना आश्चर्य वाटले आणि समजू शकले नाही की असे का झाले?
सोहेल आणि सीमा हे बऱ्याच महिन्यांपासून एकत्र राहत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरु आहे हे नक्की होते. पण या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. तर मलायकाने सोहेल मी एका साचेबद्ध लग्नात नाही राहू शकत, असे म्हणत घटस्फोट घेतला होता. अर्जूनची मैत्री याला कारणीभूत असल्याचेही म्हटले जात होते.
अशात सोहेल आणि अरबाज यांचे वडील सलीम खानही चर्चेत आले आहे. त्यांच्या वडिलांनीही दोन लग्न केली होती. पण त्यांनी दोन्ही बायकांनासोबत ठेवून सुखी संसार केला होता. त्यामुळे मुलांना घटस्फोट घेण्याची वेळ का आली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सलमान खान यांचा मुलगा सलमान खान हा अविवाहित आहे. दुसरा मुलगा अरबाज खानचा मलायका अरोराशी घटस्फोट झालेला आहे. तर तिसरा मुलगा सोहेल खान आता सीमा खानशी घटस्फोट घेत आहे. या जोडप्याने मुंबईच्या फॅमिली कोर्टमध्ये यासंबंधी अर्ज केला आहे.
सलीम खान यांनी घटस्फोटाशिवाय दोन लग्न केली होती. इतकंच नाही, तर दोन्ही पत्नी एकाच ठिकाणी राहतात.सलीम यांनी १९६४ साली सुशीला चरक यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांचं नाव आता सलमा खान आहे. त्यांना सलमान, सोहेल, अरबाज आणि अलविरा अशी चार मुलं आहे.
सलीम खान यांनी १९८१ साली अभिनेत्री हेलनशी लग्न केलं होतं. त्यांना मुल नाही, पण त्यांनी अर्पिताला मुलगी म्हणून दत्तक घेतलं होतं. दोन्ही बायका एकाच छताखाली नांदतात. असे असताना वडिलांनी दोन बायकांसोबत सुखी संसार केला पण मुलांना एक बायकोही सांभाळता येत नसल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तसेच काहींनी तर ट्रोलही केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
सलमानचा भाऊ सोहेलकडून घटस्फोट घेणाऱ्या सीमा खानचे रोहित शर्माशी आहे जवळचे नाते; वाचून चकीत व्हाल
संतापलेल्या महिलांनी केतकी चितळेवर शाई फेकत तोंड केले काळे; तरीही हसत होती केतकी