चित्रपटात अभिनेत्री आणि अभिनेता यांच्या प्रेमाची अजब गजब कहाणी सांगितली जाते. अनेक चित्रपटात अभिनेता हा अभिनेत्री मागे गाडी घेऊन, वेगवेगळ्या प्रकारे स्टंट करून, गाणी म्हणत अभिनेत्रीला खुश करत असतो. याचेच अनुकरण आजकालचे तरुण मुलं-मुली करत असताना पाहिला मिळते. अशाच स्टंटबाजीचे अनुकरण एका जोडप्याने केले आहे. त्यांनी चालत्या दुचाकीवर अश्लील चाळे केले आहेत, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर या रोडरोमियोंचा पोलिसांनी तपास केला आणि अवघ्या २४ तासात त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सूरज गौतम कांबळे असून, त्याचे २३ वर्ष वय आहे. सूरज हा सूतगिरणी चौकातील कापड दुकानाच सेल्समन आहे. तो सध्या एमएमचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले. संबंधित घटना औरंगाबाद मधून समोर आली आहे.
या व्हिडीओमध्ये धावत्या दुचाकीवर एक तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करताना पाहायला मिळतायत. चालत्या दुचाकीवर तरुण-तरुणी एकमेकांना किस करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. दुचाकी वेगाने धावत असताना तरुणी गाडीच्या पेट्रोल टँकवर चालकाकडे तोंड करुन बसलेली या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. गाडीवर अश्लील चाळे चालू असताना रोडवरील लोकांनी त्यांचा व्हिडीओ काढला आहे.
पोलिसांनी सूरजला अटक केल्यानंतर सुरजने सांगितले, त्याने आणि त्याच्या मित्रांनी ३१ डिसेंबरच्या रात्री ‘तडप’ सिनेमाचे ट्रेलर पाहिले होते. त्यावेळी, मित्रांनी त्याला ट्रेलरमधील स्टंट करण्याचे चॅलेंज दिले. सुरजने मित्रांनी दिलेले चॅलेंज स्वीकारले. त्यानंतर, त्याने त्याच्या प्रेयसीला बोलावून घेतले. त्या दोघांनी मिळून क्रांती चौक ते सेव्हन हिल आणि सेव्हन हिल ते क्रांती चौक असा प्रवास करत हा स्टंट केला.
स्टंट म्हणून या जोडप्यांची भर रस्त्यात चालू गाडीवर एकमेकांना मिठी मारत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. स्वतःच्या जीवाशी खेळत अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्यांचे व्हिडीओ रस्त्यातील लोकांनी काढले आणि व्हायरल केले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहरातील रस्त्यावर हे काय सुरु आहे,असे म्हणत पोलिसांना याबाबत कारवाईचे निर्देश दिले.
त्यानंतर, पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक अनंता तांगडे आणि कर्मचाऱ्यांनी तपास करून त्यांना ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल संतोष बमनावत यांनी त्याच्याविरोधात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी खुल्लम खुल्ला प्यार करणाऱ्या या तरुणाला ताब्यात घेतलं असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणे अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
मोदींचा ताफा थांबलेल्या ठिकाणी सापडली पाकिस्तानी बोट; धक्कादायक माहिती आली समोर
‘मेरी थुक में जान है’ म्हणत महिलेच्या केसात थुंकला जावेद हबीब, मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली तक्रार, पहा व्हिडीओ