Homeताज्या बातम्याडान्सिंग डॉल म्हटलं म्हणून संतापल्या अमृता फडणवीस; राष्ट्रवादी नेत्यावर केला अब्रुनुसानीचा गुन्हा...

डान्सिंग डॉल म्हटलं म्हणून संतापल्या अमृता फडणवीस; राष्ट्रवादी नेत्यावर केला अब्रुनुसानीचा गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले होते. या प्रकरणी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यात वाद पेटला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तिथून या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला असून अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाणांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीसांचा उल्लेख डान्सिंग डॉल म्हणून केला होता. त्यामुळे अमृता फडणवीस विद्या चव्हाणांवर चांगल्याच संतापल्या होत्या. त्यानंतर अमृता फडणवीसांनी चव्हाण यांच्या घरातील कलह काढत एकेरी भाषेत उल्लेख केला आहे.

आपल्याच सुनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेन, तिने पसरवलेली सगळी विषारी घाण! विद्या मानहानीची नोटीस वाच आणि सुधार स्वत:ला मग मिळेल तुला निर्वाण! असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हा मानहानीचा दावा असून त्याबाबचा खुलासा कोर्टातच करावा, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी विद्या चव्हाण काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीसांबाबत बोलताना, रश्मी ठाकरे यांना राबडी देवीची उपमा दिली आहे हे बरं झालं. जर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा दिली असती. निदान रश्मी ठाकरे यांची व्हाईट प्रतिमा नाही, हे तरी मला या ठिकाणी भाजपवाल्यांना सांगावं वाटतं. दुसऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकोवर तक्रार करताना, माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय गुण उधळले, त्याविषयी ट्विट केले तर बरे झाले असते.

महत्वाच्या बातम्या-
पिंपरी चिंचवड महापालिका नागरिकांना मोफत वडापाव देणार; फक्त करावे लागेल ‘हे’ काम
शाहरूखला मिळाला स्टार जावई, ‘या’ सुपरस्टारच्या घरची सून होणार सुहाना खान?
‘लागिरं झालं जी’ फेम शीतलीचा डान्स पाहून चाहते झाले घायाळ, पहा व्हायरल व्हिडिओ

ताज्या बातम्या