Sikandar Shaikh: मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील थरार नुकताच पार पडला. यामध्ये महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत झाली. शिवराज राक्षे हा यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. परंतु, सध्या सोशल मीडियावर शिवराज पेक्षा जास्त चर्चा सिकंदर शेख याची होत आहे.
2023 चा महाराष्ट्र केसरीचा किताब सोलापूर मधील मोहोळचा सिकंदर शेखच जिंकणार असे अनेकांना वाटत होते. या स्पर्धेसाठी त्याने केलेली तयारी आणि स्पर्धेमधील त्याचा खेळ पाहून तोच जिंकणार अशी सर्वांना खात्री होती. मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे सिकंदर या स्पर्धेतून बाहेर पडला.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान सिकंदरच्या आई-वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आमच्या मुलावर अन्याय झाला आहे, पंचांचा निर्णय चुकला आहे.” अशी प्रतिक्रिया सिकंदर च्या आईवडिलांनी माध्यमांना दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, ” सिकंदरला हमाली करत आम्ही मोठं केलं. काबाड कष्ट करून त्याला पैलवान बनवलं. यासाठी सिकंदरने सुद्धा रात्रंदिवस एक केला आहे, परंतु तरीही उपांत्य फेरीत कमी पॉईंट दिलें गेले हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या मुलावर जो अन्याय झालाय ,तो इतर पैलवानांवर होऊ नये,”
तसेच, पंचांनी स्वतःच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावं की त्यांचा निर्णय खरा होता. अशी मागणी देखील सिकंदरच्या वडीलांनी केली आहे. सिकंदर सोबत झालेल्या अन्यायामुळे त्याच्या आईवडिलांना जबरदस्त धक्का बसला आहे. सिकंदरने आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती. हिंदकेसरी जस्साभट्टीला सिकंदरने असमान दाखवले आहे. तर उत्तर भारतातही सिकंदर ‘टायगर ऑफ महाराष्ट्र’ म्हणून तो ओळखला जातो.
सिकंदरने पैलवान व्हावे यासाठी त्याच्या आईवडिलांनी खूप कष्ट केले आहे. वडिलांनी त्याच्यासाठी हमाली केली तर आई प्रत्येक कुस्तीसाठी त्याला प्रोत्साहन देत होती. यामुळेच सिंकदरच्या महाराष्ट्र केसरी पराभवतील धक्का त्याच्या आईवडीलांना सहन झाला नाही. या कारणाने रविवारी दिवसभर ते उपाशी होते.
महत्वाच्या बातम्या






