संपूर्ण देशाला हादरविणारी घटना दिल्लीत घडल्याचे समोर आले आहे. संगीता उर्फ दिव्या ही गायिका बेपत्ता असल्याचा FIR दिल्लीतील द्वारका भागातील पोलीस स्टेशनमध्ये नोंदविला गेला होता परंतु तीची हत्या झाल्याचे आता समोर येत आहे. या हत्येनंतर खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात हरियाणातील मेहम भागातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, त्या आरोपींनी कबुली दिली की त्यांनीच दिव्याचा खुन केला आहे. त्यांनी दिव्या हिच्या हत्येचा कट रचला होता. म्युझिक व्हिडिओ बनवायचा बहाणा सांगुन दिव्याला त्यांनी बोलावले होते. हा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला.
एका आरोपीने तिला दिल्लीमधून नेले आणि दारूमध्ये नशायुक्त पदार्थ देऊन तिला मारून टाकण्यात आले. त्यानंतर त्या दोघांनी दिव्याला मेहम भागात रस्त्याच्या कडेला पुरून टाकले. ते दोघे दिव्याचे मित्र होते. तपासासाठी द्वारका जिल्ह्याचे पोलीस पथक हरियाणाच्या मेहम येथे पोहचले. त्यावेळी या सर्व धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
सध्या मृतदेह मेहम भागातून हाती घेण्यात आला असून २४४/२२, ३०२/२०१ आईपीसी अंतर्गत मेहम पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला गेला आहे. आता दिव्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला असून आरोपी पोलिस कोठडीत आहेत आणि त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
आकाश आणि रवी अशी या आरोपींची नावे असून त्यातील रवी याच्याविरोधात दिव्याने आधीच बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. या प्रकरणाला आणखी का वळण लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या
मालवणातील तारकर्ली बीचवर मृत्यूचे तांडव; २० पर्यटकांनी भरलेली बोट भर समुद्रात बुडाली
PHOTO: रामायणमधील सीतेला शॉर्ट ड्रेसमध्ये पाहून संतापले लोक, म्हणाले, आम्ही तुम्हाला देवीचा दर्जा दिला आहे’
चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कंगना झाली ट्रोल, युजर्स म्हणाले, ‘यापेक्षा जास्त गर्दी बुलडोझर पाहायला होते’
भारतातील ‘या’ कुटुंबाकडे एकेकाळी होता सर्वात जास्त पैसा, इंग्रजही त्यांच्याकडून घ्यायचे कर्ज