पंजाब विधानसभा निवडणूक निकालात ‘आम आदमी पक्षा’नं (आप) प्रस्थापितांना धक्का देत मोठं यश प्राप्त केलं आहे. पंजाबच्या निकालाने पूर्ण राजकारण बदलून गेले आहे. 117 जागांपैक 92 जागा मिळवत आपने पंजाबमध्ये इतिहास रचला आहे. आम आदमी पक्षाच्या तडाख्यात दिग्गज नेत्यांना आपल्या जागा गमवाव्या लागल्या आहेत.
पंजाबमध्ये ‘आप’नं ‘झाडू’न कामगिरी करत आघाडी घेतली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये आता सत्ताबदल पाहायला मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे ‘आप’च्या विजयानंतर बंदी घालण्यात आलेली संघटना शीख फॉर जस्टिसने काही गंभीर आरोप केले आहेत.
याबाबत ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांना थेट शिख फॉर जस्टिसने पत्र लिहिले आहे. ‘आप’ने शिख फॉर जस्टिसच्या बनावट पत्रांद्वारे मते मिळविली आणि पार्टीने खलिस्तान समर्थक शीखांच्या मतांचे फसवे समर्थन केल्याचे म्हटले आहे. शीख फॉर जस्टिसने पत्रात आरोप केला आहे की, खलिस्तानी फंडिंगमुळे ‘आप’ने प्रचार केला नसतानाही त्यांना मते मिळाली.
दरम्यान, ‘आप’ने प्रचाराशिवाय आणि कॅडरशिवाय 70 टक्के जागा जिंकल्याचे भगवंत मान यांनी पत्रात म्हंटले आहे. दरम्यान, पंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या 48 तास अगोदर 18 फेब्रुवारी रोजी शीख फॉर जस्टिसने लेटर बॉम्ब फोडला होता. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांना लक्ष केले होते.
तसेच पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाची त्सुनामी आली आहे. आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा साप केला आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, उपमुख्यमंत्री, पंजाब कांग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
तीन राज्यांमध्ये भाजपला भोपळा, सहा राज्यांत एक आकडी जागा; राष्ट्रवादीने दाखवली थेट आकडेवारी…
‘झुंड’ला मिळालेली ‘एवढी’ जबरदस्त रेटिंग पाहून अमिताभ बच्चनही झाले शॉक, म्हणाले, हे खूपच…
‘ना लग्न, ना मुले, ना सत्तेचे भोगी, ज्यांना पाहून घाबरतात गुंड, तेच आहेत युपीचे योगी’; कंगनाच्या हटके शुभेच्छा
ठाकरे सरकार धोक्यात? थेट पंतप्रधानांनीच दिले मिशन महाराष्ट्राचे संकेत; म्हणाले…