महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपली असली तरी सध्या ती चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखचा पराभव झाला. यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा सिकंदर शेख प्रबळ दावेदार मानला जात होता. पण त्याचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला.
पंचांनी सिकंदर शेखच्या वेळी चुकीचा निर्णय घेतला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सिकंदर शेखवर अन्याय झाला आहे, असे अनेक कुस्ती तज्ञ म्हणत आहे. असे असताना आता पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे.
मारुती सातव यांनी याप्रकरणी पुण्याच्या कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कुस्ती समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, वाद व्हायला नको होता कारण पंचांनी योग्य निर्णय दिला होता.
१४ तारखेच्या कुस्तीला मारुती सातव हे पंच होते. चार पाँईंटची ऍक्शन झाल्यावर पंचांनी ते दाखवले. सिकंदर शेखच्या कोचला ते मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी थर्ड अंपायरकडे अपील केलं. तिथे दिनेश गुंड, नवनाथ धमाळ, अंकुश राणावत हे होते. रिप्ले पाहिल्यानंतर चार पाँईंट महेंद्र गायकवाडला देण्यात आले. तर एक पाँईंट सिकंदरला देण्यात आला, असे संदीप भोंडवे यांनी म्हटले आहे.
सिकंदर या कुस्तीत पराभूत झाल्यामुळे सिकंदरचा चाहतावर्ग प्रचंड नाराज झाला आहे. त्यामुळे सर्व रोख पंचांवर टाकला जात आहे. सकाळी मारुती सातव यांनी मला फोन केला होता. त्यांनी सांगितले की, मुंबईवरुन संग्राम कांबळे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. तो माझ्यावर दमदाटी करत होता, असे भोंडवे यांनी सांगितले.
तसेच दमदाटीचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संंग्राम कांबळे हा सिकंदर शेखच्या तालीमीतील जुना मल्ल आहे, तसेच तो मुंबईच्या पोलिस दलात असल्याची माहिती समोर आली आहे.
या धमकीवर सिकंदर शेखने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. संग्राम कांबळे हे गंगावेश तालमीचे फेसबूक अकाऊंट चालवतात. त्यांना काहीतरी वाईट दिसलं असेल. सगळीकडे रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्यांनी कोणतीही धमकी दिलेली नाही. फक्त तुम्ही असं का केलं, अशी विचारणा त्यांनी केली आहे, असे सिकंदरने म्हटले आहे.
स्पर्धेबाबत बोलताना सिकंदर म्हणाला की, माझा ताबा असतानाही समोरच्या पैलवानाला ४ गुण देण्यात आले. निर्णयानंतर सामन्याचे समोरील बाजूचे व्हिडिओ दाखवण्यात आले. पण पाठीमागील बाजूचं काहीच दाखवण्यात आलं नाही. मी स्पर्धेसाठी पुर्ण तयारी करुन गेलो होतो. निर्णय चुकला नसता तर मी महाराष्ट्र केसरी झाला असतो.
महत्वाच्या बातम्या-
निवडणूक आयोगाने काय त्यांच्या कानात…; सुषमा अंधारेंनी शिंदे गटाच्या आमदारांना झाप झाप झापले
गुगलने २८ वर्षांसाठी नवी मुंबईत भाड्याने घेतली जागा, महिन्याचं भाडं ऐकून चक्रावून जाल
कुत्र्यापासून वाचण्यासाठी डिलीव्हरी बॉयने उचलले धक्कादायक पाऊल, उपचारादरम्यान मृत्यु