तिन्ही बाजूंनी केली फायरिंग, मग मृत्यु झाल्याचं केलं कन्फर्म, मुसेवालाच्या मित्रांनी सांगितला थरारक घटनाक्रम
सिद्धू मुसेवालाची हत्या कशी झाली? सोबतच्या मित्रांनी सांगितला अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. चाहत्यांना धक्का बसला. त्याच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक तपशील समोर आल्यानंतर मंगळवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धू मुसेवाला आपल्या आजारी मावशीला भेटण्यासाठी बर्नाला येथे जात होता.
तो महिंद्रा थारमध्ये मित्रांसोबत बसला होता, भरदिवसा त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला आणि अखेर त्याने जगाचा निरोप घेतला. सिद्धू मुसेवालाचा मित्र गुरविंदर सिंग त्याच्या मागे थारमध्ये बसला होता. तर गुरप्रीत सिंग समोरच्या सीटवर सिद्धू मुसेवालाच्या शेजारी बसला होता. त्यांनी घटनेच्या दिवसाची ह्रदय पिळवटून टाकणारी माहिती दिली.
गुरप्रीत सिंगने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, थार जीपमध्ये पाच जणांना बसवणे कठीण झाले असते, त्यामुळे त्याने सुरक्षा रक्षकांना सोबत घेतले नाही. सिद्धू मुसेवाला त्यांच्या मावशीच्या गावी पोहोचला, गाडीच्या मागून एक गोळी झाडण्यात आली आणि दुसऱ्या वाहनाने त्यांची जीप पुढे थांबवली.
सिद्धूच्या मित्राने सांगितले की, ऑटोमॅटिक असॉल्ट रायफल घेऊन एक व्यक्ती जीपसमोर आला आणि त्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गायक सिद्धू मुसेवाला याने देखील आपल्या पिस्तुलाने दोन राऊंड फायर केले परंतु त्याची पिस्तुल असॉल्ट रायफल्सशी स्पर्धा करू शकली नाही.
गुरविंदर सिंग म्हणाले की, त्यांनी थारला तीन बाजूंनी घेरले आणि गोळीबार सुरूच ठेवला. तो म्हणाला की सिद्धू मुसेवालाने त्याच्या जीपमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाला नाही. सुमारे आठ ते दहा हल्लेखोरांनी मूसवाला यांच्यावर ३० हून अधिक गोळ्या झाडल्या होत्या, असे पोलिस सूत्रांनी सांगितले होते. ते म्हणाले की, इतक्या गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवाला जिवंत आहे की मृत आहे हे तपासले आणि ते पळून गेले.
पंजाबच्या मानसा जिल्ह्यात हत्येच्या ठिकाणी सापडलेल्या गोळ्यांवरून असे सूचित होते की हल्ल्यात एएन-94 रशियन असॉल्ट रायफलचा वापर करण्यात आला होता. पोलिसांना एक पिस्तूलही सापडले आहे, जे सिद्धू मुसेवालाचे असल्याचे सांगितले जाते, ज्यातून त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांच्या तक्रारीनंतर पंजाब पोलिसांनी हत्या आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. बलकौर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘रविवारी माझा मुलगा आणि त्याचे मित्र गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग हे थार कारमध्ये मावशीला भेटायला गेले होते. त्याने सोबत बुलेटप्रुफ फॉर्च्युनर आणि दोन गार्ड घेतले नाहीत. मी दोन सशस्त्र कर्मचार्यांसह दुसर्या कारमध्ये त्याच्या मागे जात होतो.
रस्त्यावर एक एसयूव्ही आणि एक सेडान त्याची वाट पाहत होती. प्रत्येकामध्ये चार सशस्त्र पुरुष असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, मुसेवाला ज्या कारमध्ये होता त्यावर अनेक हल्लेखोरांनी गोळीबार केला. ‘ काही मिनिटांतच माझा मुलगा बेशुद्ध झाला. मी आरडाओरडा करू लागलो आणि लोक जमा झाले. मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना रुग्णालयात नेले, तिथे त्याचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्र हादरला! जन्मदात्या आईने पोटच्या मुलांचा केला खून, नंतर जाळली प्रेतं; कारण वाचून हादराल
साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपी मौहन चौहानला फाशीच, एक वर्षाच्या आतच लावला निकाल
हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीचा केकेचा व्हिडिओ लीक, cctv मध्ये कैद झालेले शेवटचे क्षण पाहून भावूक व्हाल
ट्रॉफी जिंकताच भाऊ क्रुणाल पांड्याने हार्दिकचे केले धुमधडाक्यात स्वागत, म्हणाला, माझ्या भावा…