टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या (shweta tiwari) वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वेब सीरिजच्या घोषणेसंदर्भात भोपाळमध्ये आलेली श्वेता तिवारी तिच्या वक्तव्यामुळे अडकली आहे. वेब सीरिजच्या घोषणेदरम्यान श्वेता तिवारी म्हणाली- देव माझ्या ब्राची साईज घेत आहे. श्वेता तिवारीने हे थट्टा मस्करीमध्ये जरी म्हणले असेल तरी आता श्वेता तिवारी या विधानामुळे वादात सापडली आहे. (shweta tiwari statement gone viral on social media )
राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळ पोलिस आयुक्तांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास अहवाल मागवला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की फॅशनशी संबंधित वेब सीरिजच्या घोषणेसाठी स्टारकास्ट प्रोडक्शन टीमसोबत भोपाळला आली होती. श्वेता तिवारी चर्चेदरम्यान गंमतीने म्हणाली की, देव माझ्या ब्राची साईज घेत आहे.
या संपूर्ण प्रकरणावर आता राज्य सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळ पोलिस आयुक्तांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास अहवाल मागवला आहे. मंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, त्यांनी अभिनेत्री श्वेता तिवारीचे वक्तव्य पाहिले आणि ऐकले आहे.
त्यांचे विधान आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहे. या संपूर्ण प्रकरणात वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना भोपाळ आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, श्वेता तिवारीने असे वक्तव्य कशाच्या आधारावर केले, या बाजूने तपास केला जाईल. त्यामागचा हेतू काय होता? 24 तासांच्या आत भोपाळ आयुक्त वस्तुस्थिती तपासून त्यांना अहवाल देतील, असे गृहमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
त्यानंतर श्वेता तिवारीवर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आता श्वेता तिवारीच्या अडचणी वाढताना दिसत आहे. पुर्ण देशातून तिच्यावर टीका होत आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मिडीयावरही नेटकरी संतापले आहेत. अनेकांनी तिला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. श्वेता तिवारी याआधीही तिच्या वादग्रस्त वक्त्तव्यांमुळे चर्चेत आली होती.
दरम्यान, आपल्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाणारी श्वेता तिवारी आता फॅशनच्या एका वेब सीरिजमध्ये नव्या स्टाइलमध्ये दिसणार आहे. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत असणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचे शूटिंग भोपाळ आणि आजूबाजूच्या परिसरात होणार असून, त्याबाबतची ही पत्रकार परिषद होती. यावरून राजकारण तापले आहे.
महत्वाच्या बातम्या
शिखर धवनला वडीलांशी पंगा घेणे पडले महागात, वडीलांनी दिली कानाखाली, पहा व्हिडीओ
राष्ट्रवादीच्या आमदारानं सगळ्या तालुकाध्यक्षांना वाटल्या चारचाकी गाड्या; अजितदादांच्या हस्ते चाव्या वाटप
‘महाराष्ट्राला “मद्यराष्ट्र” करण्याकडे वाटचाल, हे सरकार जनतेचे आहे की दारुड्यांचे’
प्रजासत्ताक दिनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली अनाथ मुलांना भेट, दिलेली भेटवस्तु पाहून कौतूक वाटेल