“नवाब मलिकांनीच मुंबईत आणि शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवून आणले”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावर भाजपकडून गंभीर आरोप केले जात आहे. तसेच त्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध असल्याचा आरोपही भाजप नेते करत आहे. नवाब मलिकांच्या अटकेला महिना पूर्ण झाला असून भाजप नेते दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. (shweta mahale allegation on nawab malik)

अशात भाजपने आणखी एक गंभीर आरोप नवाब मलिकांवर केला आहे. भाजप नेत्या श्वेता महाले यांनी आता मलिकांवर आरोप केला आहे. नवाब मलिकांनीच मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले, असा गंभीर आरोप श्वेता महाले यांनी केला आहे.

नवाब मलिकांनी मुंबईत, शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवून आणले. पण आता त्याच नवाब मलिकांना वाचवण्यासाठी ठाकरे पुढे आले आहे, असे श्वेता महाले यांनी म्हटले आहे. यावेळी नवाब मलिकांवर बोलताना त्यांनी हिंदूत्वाच्या मुद्यावरुनही शिवसेनेवर टीका केली आहे.

ज्यादिवशी शिवसेना काँग्रेसमध्ये गेली, त्याचदिवशी शिवसेनेने हिंदूत्वाला लाथ मारली. शिवसेनेचे हिंदूत्व हे फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापुरतंच राहिलेलं आहे. एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांना संरक्षण दिलं जात असून योजना दिल्या जात आहे. ज्या हिंदूत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले, हे हिंदूत्व पक्षप्रमुख मात्र विसरले आहे, असेही श्वेता महाले यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक कोण आहेत… नवाब मलिकांनीच मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणलेत. शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवून आणलेत. त्या मलिकांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे आले आहेत.यापेक्षा वेगळं पाहण्याची गरज नाही. उद्याला एमआयएम जरी यांच्यासोबत आली तरी आश्चर्य वाटण्यासारखं नाही, असे श्वेता महाले यांनी म्हटले आहे.

तसेच शिवसेनेचे हिंदूत्व हे ढोंगीपणाचे हिंदूत्व आहे. ते त्यांच्या बोलण्यमध्ये दिसून येतं. प्रत्यक्ष कृतीमध्ये शिवसेनेचे हिंदूत्व कुठेही राहिलेलं नाही. ते हिंदूत्व बाळासाहेबांसोबत निघून गेलं आहे, असेही श्वेता महाले यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
MIM ची युतीची ऑफर आल्यानंतर उद्धव ठाकरेंचे खासदारांना आदेश; म्हणाले, MIM चा कट उधळून लावा अन्..
प्रेयसीची समजूत काढण्यासाठी कॉल करून गळ्यात अडकवला फास, मोबाईल निसटला आणि लाईव्ह झाला मृत्यु
घटस्फोट घेतल्यानंतर पहिल्यांदाच धनुषने ऐश्वर्या रजनीकांतसाठी केली पोस्ट, एक्स पत्नीने दिली अशी प्रतिक्रिया