Share

धक्क्यावर धक्के! हार्दिक पटेलची फोडाफोडीला सुरवात, ‘या’ बड्या काँग्रेस नेत्याला आणले भाजपमध्ये

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या वर्षात नेत्यांच्या पक्षांतराची प्रक्रियाही तीव्र होताना दिसत आहे. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. (shweta bramhabhatt in bjp)

असे असताना आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचा तरुण महिला चेहरा असलेल्या श्वेता ब्रह्मभट्ट यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. श्वेता ब्रह्मभट्ट यांनी भाजप कार्यालय गाठून पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपमध्ये जाताच हार्दिक पटेल कामाला लागल्याची चर्चा रंगली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत श्वेता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. श्वेता ब्रह्मभट्ट २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर अहमदाबादमधील मणिनगर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या.

२०१७ च्या निवडणुकीत श्वेता यांचा भाजपच्या सुरेश पटेल यांनी पराभव केला होता. श्वेता यांचे वडील नरेश ब्रह्मभट्ट हे देखील काँग्रेसशी संबंधित आहेत. काही दिवसांपूर्वी श्वेता ब्रह्मभट्ट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजभवनात भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या होत्या.

त्यानंतर श्वेता ब्रह्मभट्ट यांनी काही दिवसांतच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना श्वेता ब्रह्मभट्ट म्हणाल्या होत्या की, पक्षात आपल्याला जे ध्येय गाठायचे होते, ते पुर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आपण पक्षाला रामराम ठोकत आहोत. त्यानंतर आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेस नेतृत्वावर हल्ला करताना श्वेता ब्रह्मभट्ट यांनी काँग्रेसकडे दूरदृष्टी आणि व्यवस्थापनाचा अभाव असल्याचे म्हटले आहे. हार्दिक पटेलप्रमाणेच त्यांनीही नेत्यांवर काम करू देत नसल्याचा आरोप केला. पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली तर वरिष्ठ नेते ती कामे करू देत नाहीत, असे श्वेता ब्रह्मभट्ट म्हणाल्या आहे.

मी टीका करत नाही. माझा मुद्दा लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी झाली तर काँग्रेसलाच फायदा झाला असता, असे श्वेता म्हणाल्या आहे. विशेष म्हणजे श्वेता ब्रह्मभट्ट यांनी मे महिन्यातच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसचा राजीनामा देण्याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

महत्वाच्या बातम्या-
तिन्ही बाजूंनी केली फायरिंग, मग मृत्यु झाल्याचं केलं कन्फर्म, मुसेवालाच्या मित्रांनी सांगितला थरारक घटनाक्रम
PHOTO: मिया खलिफाने रेड बिकीनीमध्ये दाखवला हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते झाले बेकाबू
कश्मीरमधील परिस्थीती नियंत्रणाबाहेर; १८०० पंडीत, ३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी कश्मीर सोडले

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now