न्यूझीलंडविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला विजय मिळवून देण्यात सलामीवीर शुभमन गिलचा मोलाचा वाटा होता. ओपनिंग करताना शुभमनने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. त्याने 149 चेंडूत 208 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले.
आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सामन्याची सुरुवात केली. पण रोहित काही खास करू शकला नाही आणि 38 चेंडूत 34 धावा करून बाद झाला.
रोहितच्या पाठोपाठ आलेल्या विराट कोहलीलाही चांगली कामगिरी करता आली नाही आणि तो 10 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकात फक्त शुभमन गिल थोडक्यात बचावला. त्याने 149 चेंडूत 208 धावा केल्या आणि 50 व्या षटकात तो बाद झाला. यादरम्यान त्याने 19 चौकार आणि 9 षटकार मारले. सुर्यकुमार यादवने 31 चेंडूत 25 धावा केल्या.
शुभमनच्या या खेळीच्या जोरावर भारताला 349 धावा करता आल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. मात्र, सामना संपल्यानंतर शुभमनने दुहेरी शतक पूर्ण करण्याचा विचार केला नव्हता, पण 47 व्या षटकात आपला विचार बदलला, असे विधान केले.
सामना संपल्यानंतर शुभमन म्हणाला, मी मैदानावर जाण्यासाठी आणि मला जे करायचे आहे ते करण्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. विकेट्स पडत असल्याने मला काही वेळा मोकळेपणाने खेळायचे होते आणि मला आनंद आहे की मी हे करू शकलो. कधीकधी जेव्हा गोलंदाज घातक गोलंदाजी करत असतात तेव्हा तुम्हाला त्यांचे दडपण जाणवायला हवे.
डॉट बॉल टाळण्याची गरज असते, काही हेतू दाखवण्याची आणि गॅपमध्ये जोरात मारण्याची गरज असते. मी तेच करत होतो. द्विशतकाबाबत शुभमन म्हणाला की, मी 200 धावांचा विचार करत नव्हतो, पण एकदा 47व्या षटकात षटकार मारल्यावर मला वाटले की मी हे करू शकतो.
त्याआधी, मला जे करायचे होते ते मी करत राहिलो. पुढे तो म्हणाला की, किशन माझ्या सर्वोत्कृष्ट संघसहकाऱ्यांपैकी एक आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले तेव्हा मी तिथे होतो आणि ते विशेष होते. जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचे असते आणि ते नियमितपणे घडत असते तेव्हा चांगले वाटते. खेळ माझ्या अपेक्षेपेक्षा चांगला झाला. खुप छान वाटलं.
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात रोमहर्षक विजयाची नोंद करून पाहुण्या संघाचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गडी गमावून 349 धावा केल्या.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरला तेव्हा त्यांनी चांगलीच धमाकेदार खेळी केली पण त्यांनी सामना 12 धावांनी गमावला. शेवटच्या 5 चेंडूत 13 धावांची गरज होती. न्यूझीलंडने सामना जवळपास जिंकला होता पण तरी मायकेल ब्रेसवेल (140) बाद झाल्यावर संघ कोलमडला.
महत्वाच्या बातम्या
शुभमन गिलचे जबरदस्त द्विशतक! उडवल्या किवींच्या चिंधड्या; मोडले अनेक दिग्गजांचे ‘हे’ विक्रम
पृथ्वी शॉचे गाऱ्हाणे साईबाबाने ऐकले, दिले श्रद्धा अन् सबुरीचे फळ! ३ वर्षांनी टिम इंडीयात निवड
शुभमन गिलने शानदार शतकाचे सर्व श्रेय दिले विराटला; सांगीतली ‘ही’ हृदयाला हात घालणारी गोष्ट