पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांमध्ये गोंधळ सुरूच असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा यांनी भाजपचा संघटनात्मक व्हॉट्सऍप ग्रुप सोडला असला तरी ते अजूनही आमदारांच्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये आहेत. (shubhendu adhikari leave whatsapp group)
अशात दुसरीकडे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारीही अशोक दिंडांच्या समर्थनार्थ उतरले असून त्यांनीही हा व्हॉट्सऍप ग्रुप सोडला आहे. मात्र, पूर्व मिदनापूरमधील मोयना येथील भाजप आमदार अशोक डिंडा यांचे याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून बंगालमध्ये भाजपमध्ये ‘बंडाची आग’ धुमसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आता या संदर्भात भाजपचे उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिलीप घोष म्हणाले, मला माहित नाही की हे व्हॉट्सऍप ग्रुप्स कोण सोडतात आणि आमचा या व्हॉट्सअॅप ग्रुपवर विश्वास का नाही. आता विधानसभा निवडणुकीपासून बंगालमधील भाजपच्या संघटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, राज्यातील भाजप नेत्यांच्या अनेक पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत. दिलीप घोष यांच्या जागी बालूरघाटच्या खासदार सुकांता मजुमदार यांना बंगाल भाजपचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. तेव्हापासून वेगवेगळे चेहरे समोर येताना दिसून येत आहे.
संघटनात्मक बदलामुळे भाजपला बळ मिळेल, असे वाटत होते, पण याउलट बंगाल भाजपमध्ये सतत धुसफूस पाहायला मिळत आहे. शुभेंदू अधिकारी यांच्यातही धुसफूस पाहायला मिळत आहे. त्यांनी भाजपचा तमलूकचा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपही सोडला आहे, त्यामुळे ते आता पक्षाला रामराम ठोकता की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
शुभेंदू अधिकारी यांनी अशोक दिंडांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्याचा म्हटले जात आहे. मात्र, शुभेंदू हे विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना न कळवता विविध जिल्ह्यांच्या अधिकृत व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये जोडण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी व्हॉट्सऍप ग्रुप सोडले आहे असून या मागे कोणतेही राजकीय कारण नाही, असे शुभेंदू अधिकारी यांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या-
लग्नानंतर आपल्या सासरच्यांसाठी आलियाने बनवली मसालेदार भाजी, सगळ्यांची होती ‘ही’ रिऍक्शन
नितेश राणे यांना आपल्याच मतदार संघातील गावात जाण्यास बंदी, धक्कादायक कारण आले समोर
शशी कपूर यांच्या मुलाला बॉलिवूडने नाकारले तरी त्याने उभे केले स्वताचे साम्राज्य, करतो ‘हे’ काम