Share

पालकांचा घटस्फोटानंतर हादरली ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री; लग्नाचं नाव काढताच म्हणते..

आई वडिलांच्या वागणुकीचे परिणाम मोठ्या प्रमाणात मुलांवर होत असतात. कधी सकारात्मक परिणाम होत असतात, तर कधी कधी त्यांच्यातील वाद-विवाद, भांडण यांच्यामुळे नकारात्मक परिणाम देखील मुलांवर होताना आपण पाहत असतो.

बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीवर देखील आई वडिलांच्या नात्याचा नकारात्मक परिणाम झालेला आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला आहे. या अभिनेत्रीच नाव श्रुती हसन अस आहे. श्रुती हसन हिने अनेक चित्रपटांत भूमिका साकारली असून, ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री सारिका यांची ही मुलगी आहे. आपल्या आईवडिलांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर श्रुती मुंबईत आली. यानंतर या ठिकाणी ति बरीच वर्षे राहिली. परंतु आजही हिंदी कलाजगतामध्ये तिला दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणूनच ओळख दिली जाते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयष्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.

याबाबतीत तिला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली होती, जीवनाच्या या वळणावर मी लग्नासाठी काहीशी घाबरते. ही एक अशी गोष्ट आहे, जिच्यासाठी मी एकाएकी तयारही होणार नाही. माझे आईबाबा वेगळे झाले असले तरी मी त्यांच्या लग्नातील फक्त चांगल्याच आठवणी लक्षात ठेवते.

यापुढे बोलताना ती म्हणाली की, काही नाती टिकतात काही टिकत नाहीत यामुळे मी नात्यातील फक्त सकारात्मक बाजूच पहाते. माझ्या आईवडिलांच्या लग्नामागे अतिशय चांगल्या भावना होत्या, हे नातं जेव्हा योग्य मार्गावर होतं तेव्हा हे लग्नही यशस्वी होतं. त्यामुळे मीसुद्धा त्यातील चांगलेपणाच पाहते अशा शब्दांत आपली भूमिका तिने यावेळी स्पष्ट केली आहे.

याचसोबत पुढे बोलताना, त्यांचं वैवाहिक नातं टिकलं नाही, याचा अर्थ माझा विवाहसंस्थेवर विश्वास नाही असा होतच नाही, असं ठाम मत सर्वांपुढे ठेवत आता आपण लग्नाच्या विचारात नसल्याचं श्रुतीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, श्रुती बऱ्याच काळापासून चित्रपटात दिसली नाही.

महत्वाच्या बातम्या
भारतातील शेतकऱ्याने पिकवला सगळ्यात महागडा आंबा, किंमत आणि खासियत वाचून अवाक व्हाल
संभाजीराजे शिवसेनेत आले असते तर..; राज्यसभा निवडणुकीबाबत अजित पवारांचे सुचक विधान
शिवसेनेने डावलल्यानंतर संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल; राजकीय समीकरण बदलणार?
धक्कादायक! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीवर अंदाधूंद गोळीबार, जागेवरच झाला मृत्यू

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now