राज्यभरात एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीचे पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ५० हून अधिक आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे.
अशात ज्या आमदारांवर आणि मंत्र्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने कारवाई केली होती, त्यांनीच बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यास केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाया बंद होतील, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी ही बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे. पण या बंडखोरीमुळे शिवसैनिक तापले आहेत.
अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून तोडफोड केली आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर दगडफेक झाली आहे आणि त्यांच्या बॅनरवर काळं फासण्यात आलं आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचंही उल्हासनगरमधील कॅम्प दोन येथील मध्यवर्ती कार्यालय फोडण्यात आले.
त्यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबाद अशा घोषणाही दिल्या. शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. नाराज झालेल्या शिवसैनिकांनी आमदारांची कार्यालये फोडण्यास सुरूवात केली आहे.
श्रीकांत शिंदेंच्या आधी सकाळी संतापलेल्या शिवसैनिकांनी बंडखोर तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. संतापलेल्या शिवसैनिकांकडून पुण्यातील बालाजीनगर परिसरातील सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. गद्दार असे कार्यालयाच्या काचांवर लिहून या काचा फोडण्यात आल्या आहेत.
शिवसैनिकांनी सावंत विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी म्हंटलं होतं की, ‘जो शिवसेनेशी गद्दारी करेल, त्याला असेच उत्तर मिळणार. बंड करणाऱ्यांना अजूनही वेळ आहे. त्यांनी परत यावे, अन्यथा त्या सर्वांची अशीच अवस्था होईल, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
बंडखोर शिवसेना मंत्र्याने शड्डू ठोकला! उद्या गुवाहाटीहून मतदासंघात येत घेणार जाहीर सभा
ईडीच्या कारवाईमुळे आमदारांनी बंड केलं? दीपक केसरकर म्हणाले, १,२,३…
‘मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच’; बंडखोर आमदाराच्या वडीलांनी ठणकावले
शमशेराची स्टोरी झाली लीक, ‘अशी’ असेल रणबीर कपूर आणि संजय दत्तची भूमिका, वाचून वाढेल उत्सुकता