भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या जागेवरून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत.
असे असतानाही या लोकसभा मतदारसंघात अनुराग ठाकूर यांच्या हालचाली वाढल्या आहेत. अनुराग ठाकूर हे 14 फेब्रुवारीला पुन्हा एकदा कल्याण विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
याशिवाय जर भाजप येथून लढणार असेल तर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे काय होणार? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. जर श्रीकांत शिंदेंची उचलबांगडी झाली तर हा मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का असेल.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यावरच कब्जा करण्याच्या भाजपाच्या हालचालींनी शिंदे पितापुत्रांचे टेंशन वाढू शकते. तशा चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाल्या आहेत. अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्याची माहिती भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिली.
आमदार संजय केळकर म्हणाले की, ‘केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दुसऱ्यांदा कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर येत आहेत. देशातील विविध लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आहेत.
या पार्श्वभूमीवर अनुराग ठाकूरचा एकदिवसीय दौरा सुरूच आहे. गेल्या वेळी त्यांचा दौरा तीन दिवसांचा होता. 14 फेब्रुवारीला सकाळी अनुराग ठाकूर यांचा दौरा सुरू होईल. सकाळी नऊ वाजल्यापासून ते मुंब्रा परिसरातील कळवा येथून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.
पक्षांतर्गत संघटनात्मक बैठका आणि सोशल मीडिया कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन यासह सहाही विधानसभांमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेणार आहेत. त्यानंतरही अनुराग ठाकूर लोकसभा निवडणुकीपर्यंत दोन-तीन दौरे करणार आहेत.
भाजपने महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघ निवडले आहेत. त्या मतदारसंघांना सक्षम बनवून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे. महाराष्ट्रात भाजप मजबूत आहे.
मात्र लोकसभेत अधिक यश मिळविण्यासाठी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने आम्ही लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्याचे काम करत आहोत, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीला भलेमोठे खिंडार! शरद पवारांच्या सर्वात विश्वासू नेत्यावर भाजपचे जाळे
पाकिस्तानला हरवून जेमिमाने विराट स्टाईल जल्लोश करताच खेळाडूंनी धावत मारली मिठी; भारताचा सेलिब्रेशन व्हिडिओ व्हायरल
राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का! शरद पवारांचा सर्वात जवळचा ‘हा’ नेता भाजपने फोडला