Share

खराब फॉर्ममुळे ‘या’ स्टार खेळाडूची भारतीय संघातून होऊ शकते हकालपट्टी; रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय

rohit

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. अशात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव विसरून नवी सुरुवात करेल, अशी अपेक्षा प्रत्येक भारतीयाला आहे.  (shreyas ayyar leave team india)

अशात वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा एका खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. हा खेळाडू मधल्या फळीतील संघाची सर्वात मोठी कमजोरी ठरला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध रोहित शर्मा टीम इंडियावर ओझे बनलेल्या श्रेयस अय्यरला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.

अय्यर अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. त्याला चांगल्या धावा काढणे कठीण झाले आहे. श्रेयस अय्यर क्रीझवर टिकू शकत नाही. अशा स्थितीत टीम इंडियातून त्याची हकालपट्टी होऊ शकते. निवडकर्त्यांनी अय्यरला खूप संधी दिल्या आहेत. त्याच्यामुळे अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान मिळत नाहीये. अशा स्थितीत वेस्ट इंडिजविरुद्ध रोहित शर्मा श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादव किंवा दीपक हुडाला संधी देऊ शकतो.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाची मधली फळी खराब झाली. याचे सर्वात मोठे कारण होते श्रेयस अय्यर. विराट कोहली आणि शिखर धवन यांनी अनेकवेळा संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण मधल्या फळीच्या असमर्थतेमुळे भारताला क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले.

श्रेयस अय्यरला तिन्ही सामने खेळण्याची संधी मिळाली, पण तो कोणताही चमत्कार दाखवू शकला नाही. आफ्रिकन दौऱ्यावर त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. अशा परिस्थितीत त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळवणे कठीण जाणार आहे.

दरम्यान, वेस्ट इंडिज मालिकेसाठी संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. त्याचबरोबर आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध चमकदार कामगिरी करु शकतो.

महत्वाच्या बातम्या-
लग्नात वधूला मिळाले असे गिफ्ट की पाहून सगळेच झाले अवाक, व्हिडीओ पाहून लोटपोट व्हाल
अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत केले मोठे वक्तव्य; म्हणाले, मी राजीनामा दिला कारण…
दारूड्या मुलाने जन्मदात्या आईवरच केला होता बलात्कार, न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

खेळ

Join WhatsApp

Join Now