वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने बुधवारी सर्व प्रकारच्या देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. श्रीसंत नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये केरळकडून खेळताना दिसला होता. यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या साखळी फेरीनंतर श्रीसंतने निवृत्ती जाहीर केली आहे. (shreesant annouce retirement)
सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी हंगामात वेगवान गोलंदाज श्रीसंत मेघालयविरुद्ध मैदानात दिसला होता. मेघालयविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने २ बळी घेतले आणि दुसऱ्या डावात त्याला कोणतेही यश मिळाले नाही. श्रीसंतचा प्रवास वादांनी भरलेला होता.
निवृत्तीची घोषणा करताना त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, पुढील पिढीच्या क्रिकेटपटूंसाठी मी माझी क्रिकेटची कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझा एकट्याचा आहे आणि मला माहित आहे की यामुळे मला आनंद होणार नाही, माझ्या आयुष्यातील या वेळी घेतलेला हा योग्य आणि सन्माननीय निर्णय आहे. मी माझ्या खेळातला प्रत्येक क्षण आनंदाने जगलो आहे.
भारतासाठी २७ कसोटी सामने खेळलेला श्रीसंत २००७ साली टी २० विश्वचषक विजेत्या संघाचा आणि २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भारतीय संघाचा सदस्य होता. श्रीसंतने मिस्बाह-उल-हकचा झेल घेत भारतीय संघाला टी-२० विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला.
३९ वर्षीय श्रीशांतने भारतीय संघासाठी २७ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळले आहेत. याशिवाय श्रीसंतच्या नावावर ७४ प्रथम श्रेणी सामने आहेत, या ७४ सामन्यांमध्ये श्रीसंतने २१३ विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच श्रीसंतच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ८७ विकेट आहेत. क्रिकेट व्यतिरिक्त श्रीसंतने मनोरंजन क्षेत्रातही हात आजमावला आहे, त्याने टीव्ही रिअॅलिटी शो तसेच हिंदी, मल्याळम, कन्नड भाषांमध्ये एकूण ४ चित्रपट केले आहेत. त्या चित्रपटांमुळे तो चांगलाच चर्चेत आला होता.
महत्वाच्या बातम्या-
महापुरूषांना बदनाम करून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे- राज ठाकरे
सोनाक्षी नाही, तर ‘या’ अभिनेत्रीशी ठरलं होतं सलमानचं लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या; पण पुढे…
“रात्री मोठ्याने गाणी लावत रस्त्यावर गाड्यांचे स्टंट करणं हे छत्रपतींचे विचार आहेत का?”