भारताने सोमवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर तिसऱ्या दिवशी श्रीलंकेविरुद्धची दुसरी कसोटी २३८ धावांनी जिंकली. आता भारताने श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकले आहे. दुसऱ्या सामन्यानंतर यष्टिरक्षक ऋषभ पंतची ‘मॅन ऑफ द सिरीज’ आणि श्रेयस अय्यरची ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. (shrayas and jadeja is not selected man of the series)
पंतने दमदार कामगिरी करत ८ विकेट्स घेतल्या आणि विक्रमी अर्धशतकासह १८५ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने १८६ धावा केल्या होत्या. पण यावेळी मालिकावीर म्हणून पंतची निवड करण्यात आली. तो सर्वोत्तम पर्याय होता यात शंका नाही, परंतु चाहते या गोष्टीमुळे थोडे नाराज होते. रवींद्र जडेजाला किंवा श्रेयस अय्यरला हा मालिकावीराचा पुरस्कार मिळायला हवा होता, असे काही चाहत्यांचे म्हणणे आहे.
रवींद्र जडेजानेही पहिल्या कसोटीत उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीची कामगिरी केली होती. ज्यामध्ये अष्टपैलू खेळाडूने १७५ धावा केल्या आणि नऊ विकेट घेतल्या. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याने चांगली कामगिरी केली नाही आणि त्याने अनुक्रमे ४ आणि २२ धावा केल्या. जडेजाने पहिल्या कसोटीत घेतलेल्या नऊ विकेट आणि दुसऱ्या कसोटीत एका विकेटसह १० विकेट्स घेतल्या आहेत.
दुसरीकडे, या मालिकेत ऋषभ पंतची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे कारण त्याने पहिल्या कसोटीत ९७ चेंडूत ९६ धावा, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३९ धावा आणि दुसऱ्या डावात ३१ चेंडूत ५० धावा केल्या. कसोटीत त्याचा स्ट्राइक रेट १२० च्या वर होता, तर सरासरी ६१ पेक्षा जास्त होती.
प्लेअर ऑफ द सीरीज पुरस्काराबाबत, एका वापरकर्त्याने लिहिले की, मालिकेत सर्वाधिक धावा आणि १० विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाला मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळायला हवा होता. इतर चाहत्यांचीही अशीच प्रतिक्रिया होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका पहिल्या कसोटीत एक डाव आणि २२२ धावांनी तर दुसऱ्या कसोटीत २३८ धावांनी जिंकली होती.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघाने पहिल्या डावात ५९.१ षटकांत दहा गडी गमावून २५२ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात ६८.५ षटकांत नऊ गडी गमावून ३०३ धावांवर डाव घोषित केला. श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात ३५.५ षटकांत १०९ धावांत गुंडाळला गेला आणि दुसऱ्या डावात दहा गडी गमावून २०८ धावा केल्या, भारतीय संघाने २३८ धावांनी सामना जिंकून दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली आहे.
महत्वाच्या बातम्या-
गांधींनी दाखवलेल्या मार्गापासून देश भटकला होता, मोदींनी परत मार्गावर आणला- अमित शहा
माझ्याकडे ७०० लोकांची दुखभरी कहाणी, कश्मीर फाईल्सवर वेब सिरीजही बनवणार – दिग्दर्शकाची घोषणा
‘2024 मध्ये मोदी युगाचा होणार अंत, बनणार युपीए सरकार’, ‘या’ बड्या नेत्याची भविष्यवाणी