Share

शोपियाँमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत सांगलीच्या सुपूत्राला वीरमरण, २३ व्या वर्षी झाला शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये अनेकदा जवानांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक होताना दिसून येते. आता पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या शोपियाँमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील एक जवान शहीद झाला आहे. (shopia terrorist attack romit dead)

शिगावमधील रहिवासी असलेल्या या जवानाचे नाव रोमित तानाजी चव्हाण होते. तो फक्त २३ वर्षांचा होता. दहशतवाद्यांविरोधात लढा देत असताना झालेल्या चकमकीत तो शहीद झाला आहे. दहशतवाद्यांना घेराव घालण्यासाठी सुरक्षा जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. त्यामध्ये रोमितचाही समावेश होता.

जैनापुरातील चेरमार्ग भागात दहशतवादी लपलेले होते. याबाबतची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी या परीसरात घेराबंदी घातली होती आणि सर्च ऑपरेशन सुरु केले होते. याचदरम्यान दहशवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार सुरु केला.

जवानांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. मात्र राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात असलेले शिगाव गावचे सुपुत्र रोमित चव्हाण हे शहीद झाले आहे. तसेच संतोष यादव हे देखील या चकमकीत शहीद झाले आहे. या घटनेमुळे शिगावमध्ये शोककळा पसरली आहे.

पाच वर्षांपूर्वी रोमित भारतीय सेनेमध्ये भरती झाला होता. त्याचे प्राथमिक शिक्षण शिगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे झाले होते. तर माध्यमिक शिक्षण रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालयात झाले होते. उच्च शिक्षण बळवंतराव यादव महाविद्यालय पेठवडगाव येथे झाले होते. बारावी पास झाल्यानंतर तो भारतीय सैनिक दलामध्ये भरती झाला होता.

रोहितचे वडिल हे एका कारखान्यात कार्यरत आहे. त्यांच्या पश्चात वडिल, आई व एक बहिण असा परीवार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या रोमितची भारतीय सैन्यदलात भरती होण्याची खुप इच्छा होती. त्यामुळे तो वयाच्या १८ व्या वर्षीच सैन्यात भरती झाला होता.

महत्वाच्या बातम्या-
कारच्या भीषण अपघातात ५ महिन्याच्या बाळासह आईवडिलांचा मृत्यु, नागपूरातील धक्कादायक घटना
पठ्याने स्कुटर विकत घ्यायला आणली पोतंभर नाणी, शोरूम कर्मचाऱ्यांची अशी होती रिऍक्शन
धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाशी भिडली आई, १२ तास ठेवलं पकडून अन्…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now