भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. 2018 मध्ये सानिया आणि शोएब मलिक आई बाबा झाले होते. मुलगा इझानला जन्म दिल्यानंतर काही महिन्यांनी सानिया मिर्झाने तिच्या गरोदरपणाशी संबंधित गोष्टींची माहिती शेअर केली.
सानियाने आई झाल्यानंतर मैदानात परतताना तिला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले याबद्दलही सांगितले होते. आता शोएब मलिकनेही सानियाच्या प्रेग्नेंसीशी संबंधित एक रंजक माहिती शेअर केली आहे. शोएब पाकिस्तानी अभिनेत्री उषाना शाहसोबत निदा यासिरच्या शोमध्ये पोहोचला होता, जिथे त्याने आपले मुद्दे मांडले. त्याने सांगितले की सानियाचा हट्ट होता की त्यांचे बाळ हे गोरे जन्माला यावे.
शोएब म्हणाला, माझ्या सासूने सानियाला गर्भधारणेदरम्यान नेहमी सफरचंद खाण्यास सांगितले कारण तिला विश्वास होता की यामुळे बाळ गोरे होईल. यानंतर ऍकर म्हणाली, तुमचा मुलगा तर गोराच आहे. त्यावर शोएबने उत्तर दिले, खुप छान, त्यामुळेच मला वाटते की माझ्या आईची ती ट्रीक कामी आली.
सानियाने सफरचंद खाल्ल्यामुळेच मुलगा गोरा जन्माला आला असं शोएब म्हणाला. यावर ऍकर म्हणाली, ‘मला वाटते उंच आणि सुंदर असणे ही खूप मोठी गोष्ट आहे. माझा क्रश कोबे ब्रायंट हा अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू होता जो कृष्णवर्णीय अमेरिकन होता. म्हणूनच माझा या गोष्टीवर विश्वास नाही.
आपल्या इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक सुंदर महिला आहेत ज्यांचा रंग सावळा आहे. शोएब मलिक आणि सानिया यांनी 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये पारंपारिक समारंभात लग्न केले. त्यानंतर दोघांच्या लग्नाचा बराच विरोध झाला आणि दोघांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले.
त्यानंतर लग्नाच्या दहा वर्षांनी त्यांचा मुलगा इझानचा जन्म झाला. त्यानंतर अजूनही सानिया मिर्झाला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात येते. काही दिवसांपुर्वी भारत-पाकिस्तानचा सामना पार पडला त्यावेळीही सानिया मिर्झाला लोकांनी ट्रोल केले होते. त्यानंतर सानिया मिर्झाने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट काही दिवसांसाठी बंद केले होते.
महत्वाच्या बातम्या
काय आहे समान नागरी कायदा? तो जर भारतात लागू झाला तर त्याचे फायदे काय होतील?
तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची हिंमत झाली नाही, नाहीतर…; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
IAS अधिकारी आहे की फिल्मचा हिरो; पर्सनॅलिटी पाहून 4 हजार तरुणींनी घातली लग्नासाठी मागणी, पाहा फोटो
मोदी मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाच्या हालचाली; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मिळू शकते संधी