राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर आता महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला. या हल्ल्यामागच्या सूत्रधाराला शोधून कडक कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. तर हा हल्ला कोणी घडवून आणला याची माहिती मिळाल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणालेत.
तसेच सूत्रधारावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणालेत. या प्रकरणी आता वेगळी माहिती समोर येत आहे. शरद पवारांच्या घरावर हल्ल्यासाठी पुण्यातून भाडोत्री माणसं आणली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस तपासात याबाबत निष्पन्न झालं आहे.
शरद पवारांच्या घरावर हल्ल्यासाठी पुण्यातून भाडोत्री माणसं होती, एसटी कर्मचारी नव्हतेच असं पोलिस तपासात समोर आलं आहे. पुण्यातील या भाडोत्री माणसांना कोणी मुंबईत आणलं? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या हल्ल्याप्रकरणात आतापर्यंत 105 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
यात 23 महिला आंदोलकांचा समावेश आहे. तर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 82 जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. हा आकडा वाढला जावू शकतो असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक केली.
त्यांना रात्री अकरा वाजता वैद्यकीय तपासणीसाठी आधी नायर आणि मग जेजे रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे चार तास त्यांची मेडिकल जेजे मध्ये करण्यात आली. आज सदावर्ते यांना अकरा वाजताच्या दरम्यान न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी दिली आहे.
शुक्रवारी अचानक दुपारच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केले. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी थेट पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून दगडफेक, चप्पलफेक केली.
महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देणार – आदित्य ठाकरे
मला नेहमी जी भीती वाटत होती ती हीच होती; मनसेच्या कारवाईनंतर वसंत मोरेंनी सांगितली ‘मन की बात’
घरावर चपला फेकून हल्ला करण्याचं धाडस कुणी केलं? यामागच्या मास्टरमाईंडला शोधणार
पवार आजपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उतरले…; निवासस्थानावर हल्ला झाल्यानंतर धनंजय मुंडेची पहिली प्रतिक्रिया