Share

हाय मेरी परमसुंदरी! साडी घालून ‘या’ अभिनेत्रीने केला कहर, सुंदरता पाहून नेटकरीही झाले घायाळ

सेलिब्रिटी नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा त्यांच्या बोल्ड फोटोशुटने ते सगळ्यांना आकर्षित करताना दिसून येतात. पण काहीवेळा अभिनेत्री साडीत फोटोशुट करुनही सर्वांना हैराण करुन टाकतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. (shobhita dhupiyalaa saree photo viral)

असे म्हणतात साडीतच स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसतं. साडीत स्त्री इतकी सुंदर दिसते की तिचं सौंदर्य एका शब्दांत मांडणं शक्य होत नाही. त्यामुळे आता प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता धुलीपालानेही एका साडीत फोटोशूट केले आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

शोभिता धुलीपाला आपल्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. पण आता ती तिच्या साडीतील फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सोनेरी रंगाच्या साडीमध्ये शोभिता खुपच सुंदर दिसत आहे. तिने काळपट सोनेरी रंगाची साडी घातली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

काळ्या रंगाचं स्लीव्हलेस डीपनेक ब्लाऊज, गळ्यात हिराचा हार, नजर भेदणारे डोळे आणि चेहऱ्यावर असलेली एक वेगळीच चमक. या सर्व गोष्टींमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिचं हे सौंदर्य पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले असतील, असं हे तिचं सौंदर्य आहे. तिच्या फोटोवरही अनेकांनी कमेंट केल्या आहे. एकाने तर तुझ्या इतकं सुंदर कोणीच नाही, असे म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CedX6GGOCVz/?igshid=YmMyMTA2M2Y=

मेड इन हिवन या वेब सिरीजमधून शोभिताने प्रसिद्धी मिळवली होती. तिच्या अभिनयाने तिने एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला आहे. पण त्याचसोबत तिने आपल्या सौंदर्याने सुद्धा लाखो चाहत्यांना वेड लावले आहे. चित्रपटांसोबत ती वेब सिरीजमध्येही सक्रीय आहे.

शोभिता नुकतीच मेजर या चित्रपटात दिसून आली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. यामध्ये मुख्य भुमिका अवदिश सेषने निभावली असून या चित्रपटाने फक्त तीनच दिवसांत ५० कोटींचे कलेक्शन केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
औवैसींची गुगली, भाजपला राज्यसभेत हरवण्यासाठी मविआला दिली ‘ही’ ऑफर,चर्चांना उधाण
पांढरे केस, आधाराला काठी; एकेकाळी देशाचे राजकारण गाजवणारे सुरेश कलमाडी आता काय करतात?
मुंबईच्या खेळाडूने रणजीत घातला धुमाकूळ, आतापर्यंत झळकवली सात शतकं; रोहित-राहूल कधी घेणार दखल

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now