Share

पैशांसाठी काहीही! घटस्फोटाच्या चर्चांनंतर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा पुन्हा एकत्र

sania mirza shoaib malik

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. कायदेशीर अडचणी सोडवून दोघेही घटस्फोटाची घोषणा करणार आहेत. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्रींसोबत बोल्ड फोटोशूट केले. त्यामुळे शोएब मलिक आणि सानिया यांच्यात वाद झाला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे कारण सांगितले जात आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, शोएबने सानियाचा विश्वासघात केला आहे. शोएबचे अन्य कोणाशी तरी अफेअर असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान मधील चॅनेलने सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, करारावर स्वाक्षरी आणि विविध टीव्ही कार्यक्रमांसह कायदेशीर गुंतागुंतीमुळे शोएब आणि सानिया अफवांकडे लक्ष देत नाहीत. शोएब आणि सानिया यांच्यात अनेक करार आहेत जे त्यांना पूर्ण करायचे आहेत.

दरम्यान, मिर्झा-मलिक शो लवकरच प्रसारित होणार असल्याची माहिती उर्दूफ्लिक्सने सोशल मीडियावर दिली आहे. हा एक टॉक शो असेल, ज्यामध्ये सानिया आणि शोएब देखील लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतील. ही जोडी पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र काम करणार आहे.

शोबद्दल बोलताना सानिया आणि शोएब म्हणाले की, त्यांना नवीन गोष्टी एकत्र करायला आवडतात आणि शो मध्यै त्या करण्याची संधी मिळताच. त्यामुळे ते खूप उत्साहित झाले आहेत. सानिया म्हणाली, “आम्हाला आव्हाने आवडतात, त्यामुळे खेळापासून दूर जाणे आणि मीडियामध्ये काम करणे आमच्यासाठी खूप रोमांचक होते.” तर सानिया मिर्झा आणि शोएब यांचे चाहते त्यांच्या या घोषणेनंतर त्यांची खिल्ली उडवत आहेत.

दरम्यान, सध्या शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे. तो एका स्पोर्ट्स चॅनलसाठी टी-20 वर्ल्ड कपमध्ये काम करत आहे. तर सानियाने तिची कारकीर्द सुरू ठेवली असुन मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सानिया मिर्झा दुबईत असल्याचे सांगण्यात आले आहे. सानिया आणि शोएबचे लग्न १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये झाले. १५ एप्रिल रोजी लाहोरमध्ये रिसेप्शन देण्यात आले होते. दोघांना एक मुलगा इझान आहे. त्याचा जन्म २०१८ मध्ये झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –

अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी! सानिया मिर्झा अन् शोएब मलिकचा घटस्फोट

ayesha omar : कोण आहे आयशा उमर? जिच्यामुळे आलाय सानिया मिर्झा आणि शोएब मलिकमध्ये दुरावा

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now