Share

मला मुद्दाम सचिनला चेंडूने जखमी करायचे होते कारण…, शोएब अख्तरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर फलंदाजांना आऊट करण्यापेक्षा त्यांना दुखापत करण्यावर विश्वास ठेवतो. हे सत्य त्याने स्वतः अनेकदा मान्य केले आहे. नुकताच एका प्रसिद्ध यूट्यूब चॅनलवर झालेल्या संवादादरम्यान त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

यूट्यूब चॅनलवर बोलताना त्याने सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरलाही त्याला जखमी करायचे होते पण तो तसे करण्यात अपयशी ठरला. वास्तविक, २००६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका खेळली गेली होती.

मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या सचिन तेंडुलकरचा सामना पाकिस्तानच्या रावळपिंडी एक्सप्रेसशी झाला. त्याचवेळी, या सामन्यात अख्तरला त्याच्या चेंडूने सचिनला जखमी करायचे होते. जवळपास १५ वर्षांनंतर शोएब अख्तरनेच एका यूट्यूब चॅनलवरील संभाषणात याचा खुलासा केला आहे.

अख्तर म्हणाला की, “मी हे पहिल्यांदाच सांगत आहे. त्या कसोटी सामन्यात मला जाणूनबुजून सचिनला जखमी करायचे होते. मला वाटले होते की, मला सचिनला कोणत्याही किमतीत जखमी करायचे आहे. इंझमाम मला चेंडू विकेटसमोर टाकायला सांगत होता, पण मी सचिनला मारण्याचा विचार करत होतो.

मी त्याच्या हेल्मेटवर बॉल देखील मारला आणि मला वाटले की आता तो संपला असेल. पुढे बोलताना अख्तर म्हणाला, पण जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मला समजले की त्याने त्याचे डोके वाचवले आहे. त्यानंतरही मी त्याला दुखावण्याचा विचार केला. नंतर शोएब अख्तरने मोहम्मद आसिफच्या गोलंदाजीचे कौतुक केले.

त्याने आजवर मोहम्मद आसिफसारखा गोलंदाज पाहिला नसल्याचे सांगितले. मोहम्मद आसिफ खूप चांगला गोलंदाज होता. त्या दिवशी असिफसारखी चांगली गोलंदाजी करताना मी क्वचितच कोणी पाहिलं आहे. विशेष म्हणजे रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने आपल्या फास्ट बॉलिंगने सर्वांनाच हैराण केले होते.

महत्वाच्या बातम्या
जॉनी डेपने घेतला लंडनमधील भारतीय हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद, दिली ४९ लाखांची टीप
चलनी नोटांवर महात्मा गांधींऐवजी अब्दूल कलामांचा फोटो येणार? रिझर्व बॅंकेने केला खुलासा
सिद्धू मूसेवालाच्या आठवणीत ‘हा’ परदेशी रॅपर स्टेजवरच ढसाढसा रडू लागला; पहा व्हिडिओ
आपण पंतप्रधान होणार आहे हे मोदींना २००४ मध्येच कळलं होतं; जाणून घ्या सत्य साईबाबांसोबतचा ‘तो’ किस्सा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now