Share

व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या जोडप्यांना शिवसेनेचा इशारा; म्हणाले, गार्डनमध्ये शोना-बाबू करताना दिसला, तर…

आता व्हॅलेंटाईन डे आला आहे. पण खुलेआम प्रेम करणाऱ्यांना विरोध करणाऱ्या संघटनाही सज्ज होताना दिसून येत आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक दिवस आधीच लाठी पूजन करून शिवसेना कार्यकर्त्यांचा जत्था सज्ज झाला आहे. तसेच जो कोणी उघडपणे प्रेम करताना दिसून येईल त्याला चोप देण्यात येईल असा इशारा शिवसेनेने दिला आहे. (shivsena worker warning couple)

‘कोणतेही बाबू-शोना बागेत फिरताना दिसले तर त्याच्या अंगाचा एकेक कोपरा फोडून टाकणार, असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कोणतेही प्रेमी युगूल दिसले, तर त्यांना बडवणार आणि तिथेच त्यांचे लग्न लावून देणार, असे त्यांनी म्हटले आहे.

भोपाळ शहरातील कालिका शक्तीपीठ मंदिरात शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी लाठी पूजन करून व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. व्हॅलेंटाईन डे हे पाश्चिमात्य संस्कृतीचे प्रतीक असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते याला कडाडून विरोध करणार आहे.

मध्य प्रदेशातील शिवसेनेचे कार्यकर्ते सोमवारी दिवसभर लाठ्या-काठ्या घेऊन शहरभर फिरणार आहेत. एखादं जोडपं दिसलं तर तिथंच लग्न ठरवले जाणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. विरोध केलात तर लाठ्या-काठ्यांनी त्याला मारलं जाणार आहे.

या शिवसैनिकांनी शहरातील पब, रेस्टॉरंट, हॉटेल मालकांनाही इशारा दिला आहे. त्यांनी व्हॅलेंटाइन डेशी संबंधित कोणताही कार्यक्रम त्यांच्या ठिकाणी होऊ देऊ नये. जर त्यांनी त्यांनी जोडप्यांच्या बैठकीचे ठिकाण बनू दिले तर तोडफोड आणि नुकसान केले जाईल, असेही कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. अनेक वर्षांपासून शिवसेना, बजरंग दल या संघटनांचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास विरोध आहे.

लैला-मजनूस, सोहनी-मेहिवाल, सिरी-फरहाद यांच्यासारखं कोणी बनायचा प्रयत्न करु नका. व्हॅलेंटाईन डेच्या शुभमुहूर्तावर लैलाने गुलाब स्वीकारला की नाही, हे माहित नाही आणि इकडे व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसतात. त्यामुळे इथे कोणत्या प्रेमी युगूलाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला तर तिथेच त्याचे लग्न लावण्यात येईल आणि विरोध केला तर तिथेच त्याला बडवण्यात येईल, असे शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूला IPL ऑक्शनमध्येही नाही मिळाला भाव, बेस प्राईजवरच विकला गेला
उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारलं नाही तर…; अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण
असदुद्दीन ओवेसी यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, एकदिवस हिजाब घालणारी मुलगी पंतप्रधान बनेल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now