राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. असे असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. आपल्या पक्षाला पण महाविकास आघाडीत घ्यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. (shivsena with muslim legue in 1972)
जलील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेकडूनही विरोध झाला आहे. औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्यांशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे एमआयएमला आघाडीत स्थान मिळणे शक्य नसल्याचे दिसून येते.
शिवसेना आज जरी एमआयएमसोबत युती करणार नसल्याचे लक्षात येत असले, तरी इतिहासात शिवसेनेने मुस्लिम लीगशी युती केल्याचे आढळून येते. पण सध्याचे वातावरण आणि हिंदूत्वाच्या मुद्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेला वाद पाहता शिवसेना एमआयएमसोबत आघाडी करण्यास नकार देत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शिवसेनेने त्यांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच १९७२-७३ मध्ये मुस्लिम लीगशी युती करुन मुंबई महापालिकेत महापौर बसवला होता. १९७२-७३ मध्ये शिससेनेने रा सू गवई यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षासोबत युती केली होती. या दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूकही लढवली होती. मात्र आपला महापौर बनवण्यासाठी जागा कमी पडत असल्यामुळे शिवसेनेने मुस्लिम लीगचा पाठिंबा घेतला होता.
१९७९ मध्ये शिवसेना आणि मुस्लिम लीगचे नेते एका मंचावरही आले होते. नागपाड्यातील मस्तान तलाव येथील सभेच्या निमित्ताने दोन्ही पक्षातील नेते एका मंचावर आले होते. पण ही युती जास्त काळ टिकू शकली नाही. ती केवळ महापौर बनण्यापूर्तीच मर्यादित होती.
१९७६-७८ च्या काळात शिवसेनेने काँग्रेससोबतही युती केली होती. शिवसेनेने नामदेव ढसाळांच्या दलित पँथरसोबतही युती केली होती. त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत युती केली, जी २२ वर्षांपासून सुरु होती. तसेच शिवसेनेने शिवशक्ती आणि भीमशक्तीला एकत्र आणण्यासाठी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाशीही युती केली होती.
शिवसेनेची राजकीय भूमिका नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेने आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. तसेच भाजपसोबत युती असतानाही राष्ट्रपतीपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनाही त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्या या भूमिका नेहमीच चर्चेत होत्या.
महत्वाच्या बातम्या-
‘पार्थ पवार हेलिकॉप्टरने फिरण्या पलीकडे काही करत नाही, हा पुण्याचा पेंग्विन,’ भाजपाची जहरी टीका
युद्धादरम्यान रशियामध्ये कंडोमची विक्री प्रचंड वाढली; धक्कादायक कारण आले समोर
‘हा’ खेळाडू बनणार का RCB चा लकीचार्म? आजवर ज्या ज्या संघात खेळला ती टिम ठरलीय चॅम्पीयन