सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मोदी सरकारने घेतलेल्या काही नवीन निर्णयांमुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि केंद्र सरकार आमनेसामने आले आहेत. नुकतच पार्लमेंटमध्ये ‘असंसदीय’ शब्दांचा वापर करण्यास निर्बंध येणार असल्याचं सांगितलं गेलं होतं.
मात्र नंतर हा निर्णय मागे देखील घेण्यात आला असला तरी देखील, असे शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले जातील, असं स्पष्ट करण्यात आलं असल्याच समजत आहे. याचबरोबर संसद भवन परिसरात निदर्शने, धरणे, उपोषण, आंदोलन करण्याला केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
याचाच धागा पकडत आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर हल्लाबोल चढविण्यात आला आहे. “लोकशाही ही अशोक स्तंभावरील गुरगुरणाऱ्या सिंहासारखीच असायला हवी. पण सध्या राज्यकर्तेच गुरगुरत आहेत व संसदेचा भित्रा ससा करून ठेवला आहे,” असं सामनात म्हंटलं आहे.
वाचा काय म्हंटलं आहे सामना अग्रलेखात..?
“हुकूमशहा हा एक डरपोक माणूस असतो. चार गाढवे एकत्र चरत असली तरी त्याला भीती वाटते की, आपल्याविरुद्ध कटकारस्थान चालले आहे’’ आजचं चित्र यापेक्षा वेगळं दिसत नाही, असं म्हणत सामना अग्रलेखातून शिवसेनेने मोदी सरकारवर टिका केली आहे.
‘तुम्ही संसदेतही आम्ही सांगू तेच बोलायचे आणि संसदेबाहेरही आम्ही सांगतो तसेच वागायचे असा एकाधिकारशाहीचा वरवंटा फिरवला जात आहे. वास्तविक, सत्ताधाऱ्यांवर शब्दांची शस्त्रे भाजपाने जेवढी चालवली तेवढी कोणीच चालवली नसतील. लोकशाहीचे तेच तर वैभव आहे, तीच खरी शक्ती आहे,’ असं सामनामधून म्हंटलं आहे.
‘लोकशाही ही अशोक स्तंभावरील गुरगुरणाऱ्या सिंहासारखीच असायला हवी. पण सध्या राज्यकर्तेच गुरगुरत आहेत व संसदेचा भित्रा ससा करून ठेवला आहे. हरिशंकर परसाई यांनी म्हटले आहे, “हुकूमशहा हा एक डरपोक माणूस असतो. चार गाढवे एकत्र चरत असली तरी त्याला भीती वाटते की, आपल्याविरुद्ध कटकारस्थान चालले आहे।’’ आजचे चित्र यापेक्षा वेगळे दिसत नाही,”असं म्हणत सेनेने अप्रत्यक्ष टोला केंद्र सरकारला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?