काल राज्याच्या राजकीय वर्तुळात एक मोठी घटना घडली. वरिष्ठ पातळीवर ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेनेनं थेट २०१९ साली ठरलेल्या कथित अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याची फडणवीसांना आठवण करुन दिली आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपसह थेट नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं आहे.
वाचा काय म्हंटलं आहे सामना अग्रलेखातून..
“महाराष्ट्रात गुरुवारी जे घडले त्यावरून सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सगळे झूठ यावरच शिक्कामोर्तब झाले. सत्तेसाठी आम्ही शिवसेनेशी दगाबाजी केली नाही, असे सांगणाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाचा मुकुट स्वतःवर चढवून घेतला. तोदेखील कोणाच्या पाठिंब्यावर, तर या सर्व बंडाशी आमचा काही संबंध नाही असा भाव जे साळसूदपणे आणत होते, त्यांच्या पाठिंब्यावर,’ असं सामना मधून म्हटलं आहे.
पुढे सामनामधून म्हंटलं आहे की, ‘आम्हाला आश्चर्य वाटते ते देवेंद्र फडणवीस यांचे. त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री. दुसरे असे की, हाच म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता. मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?,” असा संतप्त सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
‘शिवसेनेचे आमदार फुटावेत यासाठी कोणत्या महाशक्ती प्रयत्न करीत होत्या हे मुंबईत उतरविलेल्या सैन्याने उघड केले, मात्र पक्ष बदलण्याची व फुटीरतेला उत्तेजन देण्याची प्रक्रिया राजभवनात चालणार आहे का? असाही सवाल सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, ‘पक्षातून बाहेर पडून दगाबाजी करणाऱ्या आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्याने कारवाई सुरू करताच सर्वोच्च न्यायालयाने ती रोखली व पक्षांतरबंदी कारवाईशिवाय बहुमत चाचणी घ्या, असे सांगितले. राज्यपाल व न्यायालयाने सत्य खुंटीस टांगून ठेवले व निर्णय दिले. त्यामुळे विधिमंडळाच्या भिंतीवर डोके फोडून घेण्यात अर्थ नव्हता,’ असं देखील सेनेने म्हंटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बातमी विद्यार्थ्यांसाठी! बारावीनंतर ‘हे’ कोर्सेस करा, नोकरीची १०० टक्के खात्री
आलिया-दीपिका नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे रणबीर कपूरची फेव्हरेट, म्हणाला, तिच्यासोबत रोमान्स…
‘त्या’ पत्राने घात केला अन् शिकारी स्वतःच जाळ्यात अडकला; वाचा फडणवीसांबद्दल नेमकं काय घडलं
KGF मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात, कारला ट्रकने दिली धडक, पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात