एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर कोल्हापूरमध्ये देखील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आणखी एक धक्का पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जबर बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी हमिदवाडा कारखान्यावर मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी मंडलिक समर्थकांनी काही मागण्या केल्या. कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे, अशी मागणी मंडलिक समर्थक गटाने केली
कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी मंडलिक यांनी शिंदे यांच्यासोबत जावे, अशी मागणी त्यांनी केली. संजय मंडलिक यांचे पुत्र रोहित मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला.
मंडलिक गटाने हात उंचावून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. सत्तेच्या बाजूने राहिल्यास निधी मतदारसंघात वळवून आणता येईल आणि विकासकामे करता येतील, अशीही कार्यकर्त्यांनी भूमिका यावेळी मांडली. यामुळे सध्या शिवसेनेला कोल्हापुरात मोठा धक्का बसला आहे.
याचबरोबर राष्ट्रपती निवडणुकीसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीसाठी संजय मंडलिक अनुपस्थित होते. मात्र, आपण पूर्वपरवानगीने गैरहजर होतो असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी आता शिंदे गटात सामील होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांच्याबाबतीत संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहे. मातोश्रीवरील बैठकीत त्यांनी दोन्ही काँग्रेसची संगत सोडा, अशी रोखठोक भूमिका मांडली होती. त्यामुळे तेदेखील मुख्यमंत्री शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुष्मितासोबतच्या नात्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना ललित मोदींनी सुनावले; म्हणाले, मी अजूनही मध्यम वयात…
शिंदे सरकारची घटीका भरली? सर्वोच्च न्यायालय ‘या’ तारखेला ठरवणार शिंदे सरकारचे भवितव्य
नगरच्या पठ्ठ्याच्या ‘या’ जुगाडावर आनंद महिंद्रा सुद्धा झाले फिदा; फोल्डिंग जिना पाहून म्हणाले…