ना भाजपमध्ये जाणार, ना शिवसेनेत, शिंदे गटासाठी ‘हा’ पर्याय ठरू शकतो सर्वोत्तम, तयारी झालीये सुरु

बंडखोरी करुन शिवसेनेच्या आमदारांनी भाजपशी हात मिळवणी केली आहे. तसेच आता राज्यात शिंदे आणि भाजपचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. पण या सरकारमध्ये शिंदे गटातील आमदारांचा गोंधळ उडालेला दिसत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्ममंत्रिपद मिळालं, तर बाकीच्या आमदारांना मंत्रिपद मिळणार आहे, असे असतानाही शिंदे गटातील आमदारांपुढे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.

आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाचं भवितव्य काय असणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. नेत्यांमागे हजारो पदाधिरारी, कार्यकर्ते शिंदे गटात आले आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागणं भाग पडणार आहे.

अशात शिंदे गट आपल्या हातात नेमका कोणता झेंडा घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वतंत्रपणे निवडणूका लढवाव्यात असा दबाव आमदारांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टाकण्यात येत आहे. तसेच तीन मुद्यांवर शिंदे गटाचं भवितव्य ठरणार आहे.

पहिला मुद्दा- आमदारांनी भाजपने दिलेल्या पाठिंब्यावर बंड केल्याचे म्हटले जात आहे. तसेच भाजपने ५० कोटी प्रत्येक आमदाराला दिले, त्यामुळे त्यांनी हे बंड केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत ते भाजपमध्ये गेले तर जनतेमध्ये वेगळा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवण्याची अनेक आमदारांची तयारी दिसत नाही. हा निर्णय घेण्याची शक्यता फार कमी आहे

दुसरा मुद्दा- आम्हीच शिवसेना म्हणत असलेल्या शिंदे गटाने अजूनही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आपला दावा असल्याचे म्हटले नाही. ते उद्धव ठाकरे यांच्या मनधरणीचे काम करत आहे. शिवसेनेने भाजपशी युती करावी अशी ते मागणी करत आहे. पण उद्धव ठाकरे शिवसेना उभी करण्यासाठी पुन्हा कामाला लागले आहे. त्यामुळे शिवसेनेत माघारी जाण्याचे दरवाजेही बंद झाले आहे. त्यामुळे ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही.

तिसरा मुद्दा- मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोर आमदार स्वतंत्ररित्या निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. आमदारांनी तसा शिंदे यांच्यावरही स्वतंत्र लढण्याचा दबाव टाकला आहे. असे केले तर बंडखोर आमदारांनी भाजपच्या जीवावर बंड केले याचा शिक्का पुसला जाईल. तसेच यश आले तर आमदारांची प्रतिमा आणखी उजळून निघेल आणि अपयश आलं तर शिंदे गटाला आपलं स्थान काय आहे हे लक्षात येईल.

महत्वाच्या बातम्या-
पंखा आणि बेडची उंची पाहून समजेल की…, सुशांतच्या बहिणीचा त्याच्या मृत्युबाबत खळबळजनक खुलासा
”दोन आठवडे झाले राज्याला कृषीमंत्री नाही, पेट्रोलचे दर कमी करुन काही उपकार केले नाही”
शिवाजी महाराजांवरील चित्रपट काढणाऱ्या दिग्दर्शकांना अमोल कोल्हेंचा इशारा, तर्कशुद्ध पद्धतीने महाराजांचे…