Shivsena | शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरूच राहणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. खरी शिवसेना कोण? यावर खंडपीठाने निर्णय घ्यायचा आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती दिली जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केंद्रावर टीका केली आहे.
त्या म्हणाल्या की, तुर्तास तरी कोर्टातील युक्तीवादाकडे संपुर्ण देशाचं लक्ष आहे. जेकाही निर्णय यावर होईल तो पुढील काळात पायंडा ठरू शकतो. निकाल अजूनही आलेला नाही. तुर्तास तरी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास मोकळं केलं आहे.
पुढं ते म्हणाले की, निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो, त्यामुळं पुढं काय होईल याचा अंदाज लावणं कठीण राहिलं आहे. मात्र तरी देखील आम्ही आमची बाजू लढू, असं कायंदे म्हणाल्या आहेत. अनेक शिवसेना नेत्यांना निवडणूक आयोगावर विश्वास असल्याचं दिसतंय.
दुसरीकडे अनिल देसाई म्हणाले की, हा काहीही धक्का नाही. निवडणूक आयोगाला घटनेने अधिकार दिले आहेत. योग्य पद्धतीने युक्तीवाद झाला आहे. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला हवं आहे ते आम्ही पुरवणार आहोत. त्यासाठी आमची तयारी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
चंद्रकांत खैरेनींही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला आता घटनापीठाकडून अपेक्षा आहे. शिवाय निवडणूक आयोगाला आम्ही संपुर्ण माहिती पुरवणार असून निवडणूक आयोगावर आम्हाला पुर्ण विश्वास आहे. यावेळी ते नाराज दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
Santosh banagar : संतोष बांगर हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट; शिवसैनिकांनी स्वीकारलं ‘हे’ चॅलेंज, वाद आणखी चिघळणार?
uddhav thackeray : ‘मला रणरागिणीला गमवायचं नाहीये,’ उद्धव ठाकरेंकडून स्वतः फोन करून दिला महिलेला धीर, वाचा नेमकं काय घडलंय?
Plane crash: दोन विमानांची झाली जोरदार टक्कर, दोन्ही वैमानिकांचा जाग्यावरच मृत्यु, पहा भयानक व्हिडीओ
Car Accident : एक घाव दोन तुकडे, अर्धे इकडे अर्धे तिकडे; पहा मर्सिडीजच्या अपघाताचा व्हिडीओ पाहून धक्का बसेल