राज्यात सध्या वेगवेगळ्या मुद्यावरुन राजकारण सुरु आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका लागू शकतात, अशी चर्चा होती. आता कोर्टानेही यावर निकाल दिला आहे. ओबीसी आरक्षण न लावता निकवडणुका पार पाडाव्या आणि दोन आठवड्यात निकाल जाहीर करावा, अशी घोषणा कोर्टाने केली आहे. (shivsena new formula for election)
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने जोरदार हालचाली सुरु केल्या आहे. तसेच प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे राजकीय पक्षदेखील जागे झाले आहे. पालिका निवडणूकांची तयारी करण्यासाठी बैठका सुरु झाल्या आहेत.
तसेच शहरात सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेकडून माजी नगरसेवक आणि इच्छुकांची तातडीची बैठक घेऊन राजकीय रणनिती ठरवण्यात आली आहे. पण पक्षात अनेक नेते उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने पुन्हा काही नेते नाराज होण्याची शक्यता आहे.
आता एका घरातून एकच पद देण्याचा फॉर्म्युला शिवसेनेने या निवडणूकीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाला शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. सध्या शिवसेनेच्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण आता एका घरात एकच पद हा फॉर्म्युला ठरला आहे. असे जरी असले तरी अपवादात्मक ठिकाणी बदल करण्यात येईल, असे संकेतही वरिष्ठांनी दिले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागरचना कार्यक्रमाचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून नुकताच शासनाला देण्यात आला आहे. यापूर्वी प्रभागरचना कार्यक्रमाला शासनाने स्थगिती दिली होती.लोकसंख्या वाढल्याने प्रभारसंख्याही वाढली आहे. प्रत्येक पालिकेत दोन ते तीन सदस्य वाढले आहेत. त्यात ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने निवडूका लांबणीवर पडल्या होत्या. पण आता कोर्टानेच याबाबत निकाल दिला आहे.
येत्या पंधरा दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच १४ तारखेपर्यंत यावर हरकती मागवण्यात येणार आहे. ७ जूनला त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवडणूका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
एकतर नातवंड द्या, नाहीतर 5 कोटी द्या; मुलगा-सुनेकडे आईवडिलांची अजबगजब मागणी
ठाकरेंची आणखी एक बोल्ड मैत्रीण आली समोर; दोघांचा ‘तो’ फोटो होतोय तुफान व्हायरल
भारतातील कोरोना मृत्यूसंख्या जास्त दाखवण्यामागे फार्मा कंपन्यांचे षडयंत्र?; मोदी सरकारच्या गंभीर आरोपांनी खळबळ