Share

sanjay raut : उद्धव ठाकरे राजकारणातून संन्यास घेणार अन्…; सर्वात जवळच्या सहकाऱ्याने दिली महत्वाची माहिती

uddhav thackeray

sanjay raut on uddhav thackeray  | शिवसेना खासदार संजय राऊत हे अनेकदा वेगवेगळे वक्तव्य करताना दिसून येतात. आता त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्यं केलं आहे. आमची निवृत्ती होण्याची वेळ आलीये, आता शिवसेनेची सुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे जातील, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

शिवसेनेतल्या आमच्या सारख्या लोकांनी आता पुढच्या सीटवरुन मागच्या सीटवर जायला हवं. शिवसेना नेतृत्वाची कमान पुढच्या पिढीकडे सोपवायला हवी. त्याच दृष्टीने मी आदित्य ठाकरेंकडे पाहतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आदित्यचं नेतृत्व दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललं आहे. आदित्यला युवासेना सांभाळण्याचाही मोठा अनुभव आहे. त्यांनी ठाकरे सरकारमध्ये मंत्री म्हणून खुप चांगलं काम केलं आहे. शिवसेनेची कमान तरुण नेतृत्वाकडे जााताना मला आदित्य ठाकरेंमध्ये ते सर्व गुण दिसत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

संजय राऊतांच्या या विधानांमुळे शिवसेना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची चर्चा आहे. तसेच राजकारणातून योग्य वेळी एक्झिट घेणं गरजेचं आहे, असे म्हणत त्यांनी निवृत्तीचे संकेतही दिले आहे.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर संजय राऊतांचे पत्राचाळ प्रकरण समोर आले होते. त्याप्रकरणी ते सव्वा तीन महिने न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर आता त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. ते जेव्हा कोठडीत होते. त्या काळात शिवसेनेत मोठे बदल झाल्याचेही पाहायला मिळाले.

शिवसेनेचं चिन्हं बदललं, नाव बदललं, सोबत असलेले कार्यकर्ते शिंदे गटात गेले. त्यामुळे आता पुढचं नेतृत्व आदित्य ठाकरे करतील असे राऊतांनी म्हटले आहे. गेल्या ३०-३५ वर्षांपासून आम्ही पक्षाचं नेतृत्व करतोय. त्यामुळे आता वाटतं की आमच्यासारख्या लोकांनी मागे जायला हवं. तसेच योग्यवेळी निवृत्त व्हायला हवं, असेही राऊतांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Samadhan maharaj sharma : काय सांगता? महाराजांना कीर्तनाला उशीर होऊ नये म्हणून पुणेकरांनी केली हेलिकॉप्टरची सोय
amruta fadanvis : ‘आज मैंने मुड बना लिया है’; नव्या गाण्यातला अमृता फडणवीसांचा ठुमका १ तासात १० लाख लोकांनी पाहीला
sanjay raut : …तर नारायण राणे ५० वर्षांसाठी तुरूंगात जाणार

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now