samadhan maharaj sharma | नुकताच वाघोलीला कीर्तनकार समाधान महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. पण हा कार्यक्रम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरला. कारण या कीर्तनाला महाराजांना उशीर होऊ नये म्हणून चक्क हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती.
कीर्तनाला महाराजांना उशीर होऊ नये म्हणून आयोजकांसह भाविकांनीही पुढाकार घेतला होता. आयोजकांच्या आणि भाविकांच्या या प्रयत्नांमुळे समाधान महाराज सांगलीतून पुण्यात वाघोली येथे फक्त ५५ मिनीटांत पोहोचले. त्यामुळे हा विषय सगळीकडे चर्चेचा ठरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान महाराज हे केज तालुक्यातील आहे. त्यांची सांगलीत रामकथा सुरू आहे. यादरम्यान समाधान महाराजांना दोन तासात पुण्यात पोहोचायचं होतं. वाघोली येथे त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता. पण रामकथा संपल्यानंतर तिथून वाघोलीला पोहोचणे त्यांच्यासाठी अशक्य होतं.
कीर्तनाच्या वेळेपर्यंत कसं पोहोचायचं अशी मोठी अडचण त्यांच्यासमोर उभी होती. कारण सांगली ते पुणे गाठणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी थेट हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती. सांगली ते वाघोली येथे पोहोचण्यासाठी जवळपास पाच ते सहा तासांचा वेळ लागतो.
गुरूवारी सायंकाळी सांगलीतील रामकथा पाच वाजता संपणार होती. तर दुसरीकडे वाघोलीत ७ वाजता कीर्तन महोत्सवात त्यांना पोहोचायचे होते. सांगलीतून कारने वाघोलीला पोहोचणे त्यांच्यासाठी अशक्य होते कारण त्यांच्याकडे दोनच तास होते. शेवटी भाविकांनी आणि आयोजकांनी काहीतरी तोडगा काढण्याचं ठरवलं आणि त्यांच्यासाठी थेट हेलिकॉप्टरची सोय केली.
त्यानंतर सांगलीतून समाधान महाराज ५५ मिनिटांत पुण्यात वाघोली येथे पोहोचले. हेलिकॉप्टरने त्यांची ग्रॅन्ड एन्ट्री झाली आणि भाविकांनीही आनंद व्यक्त केला. त्यांच्या हेलिकॉप्टर एन्ट्रीचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे. सहसा असं होत नाही की कीर्तनासाठी महाराज आले ते ही हेलिकॉप्टरने. भाविकांच्या आणि आयोजकांच्या प्रयत्नांमुळे हे होऊ शकले.
महत्वाच्या बातम्या
amruta fadanvis : ‘आज मैंने मुड बना लिया है’; नव्या गाण्यातला अमृता फडणवीसांचा ठुमका १ तासात १० लाख लोकांनी पाहीला
शाहरुखच्या पठाणला धडा शिकवण्यासाठी हिंदीत येतोय NTRचे काका बालकृष्ण यांचा ‘अखंडा’
चहलच्या ‘या’ कृत्यावर संतापला उमरान मलिक; LIVE मॅचमध्ये करोडो प्रेक्षकांसमोर केली शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल
महिना आठ हजार कमावणाऱ्या मजुराला भेटला दीड लाखांचा आयफोन, जाणून घ्या त्याने काय केले…