Share

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेच्या ‘या’ बड्या खासदाराचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत एक नवीन सरकार स्थापन केले आहे. राज्यातून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. (shivsena mp join shinde group)

शिवसेनेच्या अनेक आमदार शिंदे गटात सामील होताना दिसून येत आहे. अशात खासदारही शिंदे गटात जाताना दिसून येत आहे. आता उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का बसला आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित आता एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे.

राजेंद्र गावित यांच्यासह ५० पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि ते शिंदे गटात सामील झाले होते.

वसई-विरार मनपामधील ५, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, मोखाडा नगरपंचायतीच्या १२ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला जाहीरपणे पाठिंबा दिला आहे.

वसई तालुका आणि बाईसर विभागातील प्रमुख पदाधिकारी निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, बोईसर शहरप्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य कुंदन संख्ये यांनीही हाच निर्णय घेतला आहे. या सगळ्यांच्या साथीने शिवसेनेची ठाणे ग्रामीण भागातील आमची ताकद वाढली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी जेव्हा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, तेव्हा काही आमदार उपस्थितीत होते. यावेळी आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, माजी पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा तसेच जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-
सत्तेचा गैरवापर करणारे फार काळ टिकत नाहीत, केंद्रातील हुकूमशाहीचा लवकरच शेवट – शरद पवार
बंडखोरी केलेल्या आमदारांना वठणीवर आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल, घेतला ‘हा’ निर्णय
४ वर्षांनंतर ‘या’ एका अटीवर पुनरागमनासाठी तयार झाला शाहरूख, यावर्षीही नाही दिसणार पडद्यावर

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now