मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. (shivsena mla support eknath shinde after ed action)
अशात ज्या आमदारांवर आणि मंत्र्यांवर ईडी, सीबीआयने आयकर विभागाने कारवाई केली होती, त्यांनीच बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यास केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाया बंद होतील, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी ही बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे.
आमदार प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव आणि खासदार भावना गवळी यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. भाजपच्या जवळ गेल्यास निदान केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा तरी सुटेल, असे लोकप्रतिनिधींना वाटत असावे, अशीही चर्चा रंगली आहे.
शिवसेनेचे काही आमदार राष्ट्रावादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांवर नाराजी असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. तर काही नेते हे ईडी आणि सीबीआयचे अधिकारी कारवाई करत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे.
भाजपमध्ये गेल्याने ईडी वैगेरेचा त्रास नाही. शांत झोप लागते, असे विधान माजी सहाकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांनी ज्या नारायण राणे आणि व कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप केले होते, ते भाजपमध्ये जाताच सर्व चौकशा बंद झाल्या होत्या.
आतापर्यंतचा इतिहास पाहता भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची केंद्रीय यंत्रणांनी चौकशी बंद केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे काही नेते हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. सध्या प्रताप सरनाईकांचीही ईडीची चौकशीही सुरु होती. बरेच दिवसांपासून ते आणि त्यांचे कुटुंब अडचणीत होते. त्यामुळे त्यांनी आधी शिवसेनेने भाजपसोबत जावे, असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.
तसेच यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाचे छापे पडले होते. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांच्यावरही ईडीची नजर आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचे म्हटले जात आहे. तर खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. बंडखोर आमदारांवर कारवाई करु नये, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या त्यांच्या निकटवर्तीयांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे, असे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
…तोपर्यंत राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारमध्ये राहणार; शरद पवारांनी एका शब्दातच केलं स्पष्ट
विधानसभेच्या प्रांगणात याल तेव्हा इथे आसामचे नेते येणार नाहीत; पवारांची बंडखोरांना थेट धमकी
सोमय्यांच्या ‘डर्टी डझन’ डझन यादीतील ‘हे’ दोन आमदार आता भाजपला चालणार का?






