Share

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच बंडखोर आमदार तुफान नाचू लागले, टेबलवरून चढून..; पहा व्हिडिओ..

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे काही दिवसांपासून आसामच्या गुवाहटीत होते. पण आता ते मुंबईत आले आहे. त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करुन सरकार स्थापनेचा निर्णय घेतला आहे.  (shivsena mla dance viral video)

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तसेच अशी चर्चा होती की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, पण देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे सगळेच नेते हैराण झाले आहे. तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा झाल्यामुळे त्यांच्या गटात असलेल्या सर्व आमदारांनी जल्लोष साजरा केला आहे.

आमदारांनी हॉटेलमध्ये तुफान डान्स केला आहे. हॉटेलमध्ये असलेल्या टेबलावर चढून आमदारांनी डान्स केला आहे. आमदारांच्या या डान्सचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे असलेल्या ३९ आमदारांसोबत भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. त्यानंतर शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून निवड केल्यानंतर आमदारांनी डान्स करुन ते साजरा केलं आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक आमदार हे डान्स करताना दिसून येत आहे. त्यातले काहीजण हे थेट टेबलावर डान्स करताना दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. या आमदारांसोबतच राज्यातील एकनाथ शिंदे समर्थकांनी सुद्धा जल्लोष साजरा केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आसाममध्ये होते. आज सकाळी ते मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
ज्या अभिनेत्यावर होता मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप, तोच आता बिग बॉसमध्ये घालणार धुमाकूूळ
एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून निवड होताच शरद पवारांकडून खास स्टाईलमध्ये शुभेच्छा; म्हणाले, सातारकर…
PHOTO: BCCI ने फटकारलं तरी भारताच्या खेळाडूंना येईना अक्कल, कोरोनाचे नियम मोडून करतायत पार्ट्या

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now