राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या देवेंद्र फडणवीसांचा प्लॅन यशस्वी झाला आहे. या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक सहाव्या क्रमांकावर राहिले आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत होती. आता धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातून दोन उमेदवार रिंगणात होते. त्यात आता धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. भाजपने धनंजय महाडिक यांना सहावा उमेदवार म्हणून उमेदवारी दिली होती. त्यांची ती स्ट्रॅटेजी यशस्वी झाली आहे. धनंजय महाडिकाच्या विजयाने महाविकास आघाडीला, विशेषत: शिवसेनेला खूपच मोठा धक्का बसला आहे.
महाविकास आघाडीची काही मते फुटल्याचे दिसून येत आहे. भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना महाविकास आघाडीची काही मते काही मते पडल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील मतांच्या फाटाफूटीमुळे आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे सिद्ध झाले आहे.
सोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे पहीले पाच उमेदवार सहज विजयी झाले आहेत. त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43 मते, इम्रान प्रतापगढ़ी- काँग्रेस- 44 मते, पियुष गोयल-भाजप-48 मते, अनिल बोंडे- भाजप- 48, संजय राऊत- शिवसेना- 42 मते. याप्रममाणे मते उमेदवारांना मिळाली.
पहील्या फेरीत भाजपच्या धनंजय महाडीकांना २७ मते मिळाली, तर शिवसेनेच्या संजय पवारांना ३३ मते मिळाली. पण भाजपच्या उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते जास्त असल्यामुळे महाडीकांचा सहज विजय झाला. येथे फडणवीस मॅन ऑफ द मॅच ठरले.
गणित कुठे चुकले याचा अभ्यास करणार असे निकालानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगीतले. तर निवडणूका केवळ लढवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढवली होती. जय महाराष्ट्र! अशी प्रतिक्रीया भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
धनंजय महाडिक यांच्या या विजयानंतर कोल्हापुरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यांच्या पत्नीने जो जिता वही सिकंदर अशी प्रतिक्रीया दिली. भर पहाटे कोल्हापुरातील रस्त्यांवर फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी महाडीक कुटुंबीयांनी फडणवीसांचे आभार मानले
महत्वाच्या बातम्या
त्यांचं ते थम्प्स अप कधीच विसरणार नाही, जगतापांची एकनिष्ठता पाहून फडणवीस झाले भावूक
फडणवीसांनी दाखवलेला विश्वास मरेपर्यंत टिकवेन म्हणत सदाभाऊंनी सांगीतली विजयाची स्ट्रॅटेजी
राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं, नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना टोला