सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आज मातोश्रीवर सर्व खासदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून खासदारही आपली नाराजी व्यक्त करत आहेत. भाजपसोबत चला, अशी मागणी अनेक खासदार उद्धव ठाकरेंकडे करत आहेत.
मात्र अद्याप उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या या मागणीला हिरवा कंदील दिलेला नाहीये. यामुळे आता आमदारांपाठोपाठ खासदारांनीही बंड पुकारण्याचे संकेत दिले आहे. यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याच बोललं जातं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना राष्ट्रपती निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता असल्याच सांगण्यात येत आहे. यामुळे उद्धव ठाकरे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला धक्का देणार असल्याच देखील बोललं जातं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंकडे एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र त्यालाही अद्याप उद्धव ठाकरेंनी हिरवा कंदील दिलेला नाहीये.
यामुळे शिवसेनेच्याच खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केल्यामुळे शिवसेनेत पुन्हा बंड पुकारले जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आज मातोश्रीवर काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यात शिंदे – फडणवीस स्थापन झाल्यापासून शिवसेनेतील खासदार उद्धव ठाकरेंकडे भाजपसोबत जाऊ अशी मागणी करत आहेत. मात्र अद्याप तरी उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य केलेलं नाहीये. मात्र खासदारांनीदेखील बंड करत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. तर शिवसेनेला मोठा फटका बसेल, ही शक्यता नाकारता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
चुकीला माफी नाही! गद्दार आमदार संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी; बांगर म्हणाले…
“कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे?”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचा सवाल
…म्हणून राष्ट्रपतिपदाची उमेदवारी नाकारली; शरद पवारांनी केला मोठा खुलासा
“कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे?”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचा सवाल