Share

shivsena : बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात स्वतः उद्धव ठाकरे खिंडार पाडणार? ‘असा’ आहे प्लान B

udhav thackeray

shivsena : पक्षबांधणीसाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे हे जोमाने मैदानात उतरले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली अन् शिंदे गटाला समर्थन दिले. यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली.

40 आमदारांनी शिंदे गटाला समर्थन दिले, तर तब्बल 12 खासदारांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडली. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत 2 गट पडले. गळती लागलेल्या पक्षाला सावरण्यासाठी आता उद्धव ठाकरे जोमाने कामाला लागले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे रणनीती आखत आहेत.

अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे खिंडार पाडणार असल्याच बोलल जातं आहे. शिंदे गटात गेलेल्या 12 खासदारांच्या मतदारसंघात लोकसभा उमेदवारांची ठाकरे गटाकडून चाचपणी करण्यात येत असल्याच बोलल जात आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे प्लॅन करत असल्याच बोलल जातं आहे. पुन्हा एकदा नव्याने पक्षाला उभारणी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील रामटेक, यवतमाळ- वाशिम मतदार संघात ठाकरे गटाने तगडा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

पक्ष सोडून गेलेल्या बाराही खासदारांच्या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या ठाकरे गटात बैठकांचे सत्र देखील सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकांमधून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याच बोलल जातं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या प्लॅनमुळे आता या 12 खासदारांची डोकेदुखी वाढणार हे नक्की.! यामुळे सध्या 12 खासदार देखील चिंतेत असल्याच बोलल जातं आहे. उद्धव ठाकरेंचा हा प्लॅन आता किती यशस्वी होणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या  
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी… 
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई 
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर 
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर
ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now