Share

‘घरी बसेन पण भाजपमध्ये जाणार नाही’, शिवसेना आमदाराने स्पष्टच ठणकावून सांगितलं

udhav

शिवेसेने आमदार तानाजी सावंत अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. ते भाजपमध्ये जाणार असल्याच बोललं जातं होतं. तानाजी सावंत यांनी सत्ताबदलाचा इशारा दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तानाजी सावंत हे पक्ष सोडणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.

यावर आता खुद्द तानाजी सावतांनी सविस्तर भाष्य केलं आहे. स्वत: तानाजी सावंत यांनीच आपण शिवसेना सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. मी घरी बसेन पण दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात घेणार नाही, असं तानाजी सावंत म्हणालेत.

याबद्दल काल ते उस्मानाबादमध्ये शिवसंपर्क अभियानावेळी बोलत होते. यावेळी बोलताना तानाजी सावंत म्हणाले, ‘मी भाजपमध्ये जाणार नाही. मी शिवसेना सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. शिवसेना माझ्या घरात, माझ्या मनात आहे. धाराशिव जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा फडकविणार हे वचन देतो.’

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मी सध्या शिवसेना पक्षात असून शिवसेनेतच काहील असे सांगितले आहे. तसेच शिवसेना पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी मी सजग होऊन पार पाडत आहे. कोण काय म्हणतंय तसेच काय चर्चा करतोय याकडे मी लक्ष देत नाही असं सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सावंत हे युती सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेससोबत झालेल्या महाविकासआघाडी सरकारमुळे अनेकांना मंत्री पदापासून दूर राहावे लागले आहे. तानाजी सावंत यांचा देखील पदापासून दूर रहावे लागले. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

काही दिवसांपूर्वी सावंत यांनी आगामी काळात तुम्हाला काही बदल दिसतील. मी लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर माझ्याकडे काय मागायचे आहे ते मागा, असे तानाजी सावंत म्हटलं होत. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या
अभिनेत्रीच्या फोटोंनी उडाली खळबळ, ब्लाऊज न घालताच उभी राहिली बाल्कनीत, पहा फोटो
सुपरस्टार प्रभासने ‘या’ बड्या डायरेक्टरच्या चित्रपटाला मारली लाथ, नेमकं काय आहे प्रकरण, वाचा
क्रेटा, ब्रेझा सगळ्यांना मागे टाकत टाटाची ‘ही’ नंबर 1, एका महिन्यात 14 हजार युनिट्सची विक्री
जितेंद्र आव्हाडांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर केले गंभीर आरोप; वाचा नेमकं काय म्हणाले?

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now